मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर व्हिजन झीरो प्रोजेक्ट राबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:21 AM2019-08-10T02:21:00+5:302019-08-10T02:21:26+5:30

सेव्ह लाइफ फाउंडेशन, व्होलक्सवॅगन ग्रुपच्या सहकार्याने व्हिजन झीरो प्रोजेक्टचा शुभारंभ

Vision Zero Project to be implemented on Mumbai-Pune National Highway | मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर व्हिजन झीरो प्रोजेक्ट राबवणार

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर व्हिजन झीरो प्रोजेक्ट राबवणार

Next

मुंबई : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सेव्ह लाइफ फाउंडेशन, व्होलक्सवॅगन ग्रुपच्या सहकार्याने व्हिजन झीरो प्रोजेक्टचा शुभारंभ शुक्रवारी केला. यामुळे या मार्गावरील अपघातांमध्ये नक्कीच घट येईल, असा दावा करण्यात येत आहे.

मुंबई-पुणे (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८) हा सर्वाधिक रहदारीचा आणि दोन्ही बाजूंना नागरी वस्ती असलेला महामार्ग आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पर्यायी रस्ता म्हणून हा महामार्ग ओळखला जातो. या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एमएसआरडीसी यांच्यासोबत सेव्ह लाइफ फाउंडेशन, व्होलक्सवॅगन ग्रुप, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गृह विभाग यांनी एकत्रितपणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वर व्हिजन झीरो प्रोजेक्टचा शुभारंभ केला.

या उपक्रमाची मुहूर्तमेढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापरिवर्तन अभियानांतर्गत फेब्रुवारी २०१९ मध्ये रोवली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी महामंडळाचे मॉडेल देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर राबविले गेले पाहिजे, असे स्पष्ट केले. या वेळी अप्पर पोलीस महासंचालक (महामार्ग पोलीस) विनय करगांवकर म्हणाले, रस्त्यावरील ८० टक्के अपघात हे मानवी चुकीमुळे होतात. अपघात रोखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी होईलच; पण, प्रत्येक वाहनचालकाला स्वत:हून वाटले पाहिजे की, कुठल्याही अपघाताला मी कारण नसेन. लोकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे.
महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार म्हणाले, अपघात रोखण्यासाठी आवश्यक तेथे अभियांत्रिकी उपाय करण्यात येतील. कायद्यात दंडाची तरतूद आहे. पण त्याची अंमलबजावणी कठोरपणे करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Vision Zero Project to be implemented on Mumbai-Pune National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात