मुंबई : सर्वसामान्य लोकांना भरघोस व्याजाचे आमीष दाखवत बोगस गुंतवणूक योजनेद्वारे १०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्हीआयपीएस समूहावर ईडीने छापेमारी केली. या कारवाईत १४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कंपनीच्या मालकीचे पुणे, धाराशीव, कोल्हापूर आणि सांगलीतील भूखंड, फ्लॅटचाही समावेश आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात कंपनीचा मालक विनोद कुटे मास्टरमाईंड आहे. त्याच्यासोबत संतोष कुटे, मंगेश कुटे आणि अन्य साथीदारांनी काही गुंतवणूक योजना सादर करत ही रक्कम गोळा केली होती. सर्वसामान्य लोकांकडून गोळा केलेली रक्कम त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून दुबई येथे वळवली आणि तेथून हवालाच्या माध्यमातून तसेच रोखीने आणि क्रिप्टोच्या माध्यमातून फिरवत मालमत्तांची खरेदी केली. त्यानंतर विनोद कुटे दुबईत पळून गेला. या प्रकरणी सर्वप्रथम पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
व्हीआयपीएसच्या विनोद कुटेची १४ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:31 IST