सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार - सुशीलकुमार शिंदेंचा आरोप

By Admin | Updated: August 1, 2016 11:54 IST2016-08-01T11:53:48+5:302016-08-01T11:54:10+5:30

सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार वाढल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

Violence of government's publicity in Kashmir - Violence in Kashmir - Sushilkumar Shinde's allegations | सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार - सुशीलकुमार शिंदेंचा आरोप

सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार - सुशीलकुमार शिंदेंचा आरोप

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ -  सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार वाढल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. देशात दलितांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात या घटना वाढल्या आहेत. हे सरकार स्वैराचारी आहे असेही ते म्हणाले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालापामध्ये ते बोलत होते.
 
काश्मीरमधील माध्यमांशी संवाद साधणे गरजेचे आहे. चीन घुसखोरी करतेय. पाकिस्तानने एका जवानांचे शीर पाठवले तर आम्ही दहा शीर आणू असे म्हणणारे मोदी शत्रूचे शीर का आणत नाहीत? केवळ आपल्याच जनावांची शिरे कापली जात आहेत ? असा सवालही त्यांनी विचारला.

Web Title: Violence of government's publicity in Kashmir - Violence in Kashmir - Sushilkumar Shinde's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.