शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दहावीपर्यंत मराठी लवकरच सक्तीची करणार : विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 03:56 IST

राज्यातील सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले.मराठी भाषेवरून गेले २ दिवस विधिमंडळात गदारोळ सुरू आहे. काल राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न झाल्याने सदस्यांना इंग्रजी भाषण ऐकावे लागले.मंगळवारी मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवनाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेल्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...’ या अभिमान गीतातील शेवटचे कडवे न गायले गेल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अमराठी शाळांत मराठी सक्तीची करावी, अशी एकमुखी भावना सभागृहात व्यक्त झाली. कर्नाटकात कन्नड भाषा दहावीपर्यंत अनिवार्य आहे. मग महाराष्ट्रात मराठी अनिवार्य का नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मराठी दिनाचे औचित्य साधून दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय एकमुखाने घेऊनच टाका, असा आग्रह त्यांनी धरला.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शाळांत मराठीच्या सक्तीची भावना व्यक्त केली. त्याला भाजपा-शिवसेना सदस्यांनी पाठिंबा दिला. यावर, तावडे म्हणाले की, मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करावी की बारावीपर्यंत, याचा विचार सुरू आहे.सध्या आठवीपर्यंत मराठी अनिवार्य आहे. सभागृहाच्या भावना अभ्यास मंडळास कळवून त्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018marathiमराठीSchoolशाळाVinod Tawdeविनोद तावडे