गड-किल्ल्यांची स्वच्छता करणाऱ्या संस्थांचा विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 07:01 PM2017-11-23T19:01:45+5:302017-11-23T20:03:41+5:30

महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांची स्वच्छता करणार्या राज्यातील विविध संस्थांचा सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला.

Vinod Tawde honored the institution of cleaning of fort-caste | गड-किल्ल्यांची स्वच्छता करणाऱ्या संस्थांचा विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मान

गड-किल्ल्यांची स्वच्छता करणाऱ्या संस्थांचा विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मान

Next

मुंबई- महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांची स्वच्छता करणार्या राज्यातील विविध संस्थांचा सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून १०८ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. सन्मानसोहळ्या बरोबरच विनोद तावडे यांनी संघटनांची मते तसेच सूचना जाणून घेतल्या. येत्या वर्षभरात या सूचनांवर विचार करुन त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणाले, ' इंग्रजांनी तोफा लावून आपले गड फोडले तरी २०० वर्षे आपले गड कोणत्याही डागडुजीविना उभे आहेत. सध्या उद्घाटनापुर्वी पूल पडतात अशा काळात हे गड कोणत्याही काळजीविना ठाम उभे आहेत. या गडांची डागडुजी व इतिहासाचे जतन करणे हा मराठी माणसाचा धर्म आहे. गेल्या ४० ते ५० वर्षांत दुर्गप्रेमींच्या चळवळीमुळे, दबावामुळे शासनाला घ्यावी लागत आहे.' 

या कार्यक्रमासाठी पर्यटन आणि सांस्कृतीक विभागाचे सचिव नितिन गद्रे, पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालय विभागाचे सचिव तेजस गर्गे आणि पुराभिलेख विभागाचे सचिव सुशील गर्जे उपस्थित होते.

युनेस्कोव्दारा १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन तसेच भारत सरकारव्दारा १९ ते २५ नोव्हेंबर हा जागतीक वारसा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश जन सामान्यांमध्ये प्राचीन वारश्याबद्दल जागृती निर्माण करणे व भावी पिढ्यांना सांस्कृतिक ठेव्याविषयी आस्था निर्माण करणे हा असतो. ह्या जागतिक व देशव्यापी मोहीमेचा भाग म्हणून राज्य सरकारच्यावतीने १९ ते २५ नोव्हेंबर २०१७ ह्या दरम्यान जागतिक वारसा सप्ताह म्हणून साजरा करीत आहे.

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयातर्फे या निमित्ताने प्राचीन वारश्या संबंधी व्यापक जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. नागपूर विभागात नगरधन येथील उत्खननात सापडलेल्या पुरावस्तुचे छायाचित्र प्रदर्शन तसेच नगरधन येथे स्वच्छता अभियान, औरंगाबाद विभागातील सोनेरी महल येथे प्राचीन नाण्यांचे तर नांदेड विभागतर्फे स्मारकाच्या जतन दुरुस्ती कार्यांची छायाचित्रप्रदर्शनी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाशिक विभागात सरकारवाडा येथे संस्कृती व आपण तसेच स्मारकाच्या जतन दुरुस्ती कार्यांवर छायाचित्र प्रदर्शनी हेरिटेज वॉक, कला व संस्कृती या विषयांवर कार्यशाळा व व्याख्याने तर पुणे विभागात तुंग, पांडवदरा, लक्ष्मी विलास पॅलेस, कोयरीगड, निरानृरसिंहपूर व संग्रामदुर्ग येथे स्वच्छता अभियान करायचे नियोजित आहे. रत्नागिरी विभागातर्फे थिबा पॅलेस येथे स्वच्छता अभियान व इतर जनजागृतीचे कार्यक्रम निर्धारीत आहेत.

संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, चंद्रकांत मांढरे, नागपूर, सिंदखेड राजा, औरंगाबाद, सांगली, सातारा, औंध, नाशिक, रत्नागिरी, पैठण, तेर व माहूर या १३ शासकीय संग्रहालयांमध्ये चित्रकला स्पर्धा, प्राचीन पध्दतीची दगडी हत्यारे व मातीची भांडी बनवण्याची कार्यशाळा, वारसा संबंधी व्याख्याने, गडकिल्ला परिसंवाद, संग्रहालय परिसर स्वच्छता अभियान, वकृत्व स्पर्धा, जनजागृतीसंबंधी नाटक, वारस जागृती संबंधी प्रदर्शित करण्यात आलेल्या वस्तुंची विद्यार्थ्यांना माहिती देणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Web Title: Vinod Tawde honored the institution of cleaning of fort-caste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.