विनोद कांबळीची नवी इनिंग, भाजपात करणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 16:51 IST2017-02-07T16:51:55+5:302017-02-07T16:51:55+5:30

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार

Vinod Kambli's new innings, BJP admission | विनोद कांबळीची नवी इनिंग, भाजपात करणार प्रवेश

विनोद कांबळीची नवी इनिंग, भाजपात करणार प्रवेश

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. यापुर्वी 2012 मध्ये लोकभारती पक्षाच्या तिकीटावर  कांबळीने  मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कांबळी सामाजिक कार्यांमध्ये सहभागी झाले होते. आता ते राजकारणात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत.
 
कॉंग्रेसमधून नुकतंच भाजपात प्रवेश केलेले मुंबई बाजपाचे उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांच्या आग्रहाखातर कांबळीने भाजपात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कांबळी भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे
 

Web Title: Vinod Kambli's new innings, BJP admission