शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Vinayak Mete Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी होणार; मेटेंच्या अपघातावर विधानसभेत फडणवीस-अजित पवार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:01 IST

विधानसभेत विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवरून लक्षवेधी दाखल करण्यात आली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चर्चा केली. 

विनायक मेटेंच्या अपघाताला एक्स्प्रेस वेवरील अवजड वाहतूक जबाबदार आहे. ट्रक चालकांना एका लाईनमध्ये जाण्यास सांगितले तरी ते जाणार नाहीत. त्यांच्या बाजुने जाण्यास छोट्या वाहनांचे चालक घाबरतात. यामुळे जर एक्स्प्रेस वेचा विस्तार केला तर ट्रक चालकांना दोन लेन देता येतील. कारण त्यांनाही ओव्हरटेक मारावी लागते. यामुळे चौथ्या लेनचा विस्तार सरकारने करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. 

विधानसभेत विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवरून लक्षवेधी दाखल करण्यात आली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चर्चा केली. पोलीस ठाण्यांनी हद्दीचा प्रश्न आणू नये. अनेकदा पोलीस हे माझ्या हद्दीत नाही, त्याच्या हद्दीत असेल असे म्हणतात. मेटे यांच्या पत्नीने मला पोलिसांचा प्रश्न सांगितला. एक्स्प्रेसवेवर वेग मर्यादा आहे, आमदारांना लाखा लाखात दंड होतात, अनेकांनी सांगितले की महिन्याचे जे काही मिळते ते सारे तिकडेच जाते, असेही अजित पवार म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्या गाडीचा चालक सारखा स्टेटमेंट बदलतोय. यामुळे घातपात झाल्याचा संशय तयार होतोय. यावर सीआयडी चौकशी सुरु केली आहे. मेटेंच्या चालकाने ११२ नंबरवर फोन केल्याचे म्हटलेय. पण त्याने केला की नाही हे समजलेले नाही. या प्रकरणी आणखी एक अधिकारी नियुक्त केला जाईल. अजित पवारांनी महत्वाचा मुद्दा मांडला. एक्स्प्रेस वेवर जी काही कोंडी होतेय, त्यावर तोडगा काढू. चौथ्या लेनचे कामही करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राजकीय नेत्यांना प्रवास करावा लागतो. त्यांनी रात्रीचा प्रवास टाळावा, असे आवाहनही फडणवीस यांनी नेत्यांना केले. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस