विनायक मेटे मृत्यू प्रकरण; रुग्णालयात आणण्याच्या दोन तासआधी झाला होता मृत्यू! ज्योती मेटे यांचा दावा
By शिरीष शिंदे | Updated: August 15, 2022 20:14 IST2022-08-15T20:12:14+5:302022-08-15T20:14:02+5:30
"मेडिकल टरमिनॉलोजीनुसार, मृत्यूपश्चात माणूस पांढरा फटक पडत नाही. मेटे साहेंबाचा चेहरा आतोनात पांढरा पडलेला होता. त्यांच्या नाक व कानातून रक्त येत होते."

विनायक मेटे मृत्यू प्रकरण; रुग्णालयात आणण्याच्या दोन तासआधी झाला होता मृत्यू! ज्योती मेटे यांचा दावा
बीड: आम्हाला कळविण्यात आलेल्या अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर विनायक मेटे यांचा मृत्यू रुग्णालयात आणण्यापुरवीच झाला होता, असा दावाही त्यांनी सोमवारी केला. त्यांच्या मृत्यूचे कारण पीएम रिपोर्टमध्ये समोर येईलच असेही त्यांनी म्हटले आहे. त्या एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होत्या.
मुंबई-पुणे द्रुतगती महामारगावरील भातण बोगद्याजवळ माजी आ. विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. यासंदर्भात बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना कामोठे रुग्णालयात पहाताच समजून आले, की समथिंग इज राँग. मेडिकल टरमिनॉलोजीनुसार, मृत्यूपश्चात माणूस पांढरा फटक पडत नाही. मेटे साहेंबाचा चेहरा आतोनात पांढरा पडलेला होता. त्यांच्या नाक व कानातून रक्त येत होते. त्यानंतर मी माझ्या भावाला सांगतिले ही घटना पाऊन तासापूर्वी घडलेली नाही. हा अपघात होऊन किमान दोन तास झाले असतील. काही तरी आमच्यापासून लपवले जात होते. कदाचीत लपवले जात नसेल, परंतु मला फोन येण्याआगोदर ती घटना घडून खूप वेळ झालेला होता. मृत्यूची वेळ पीएम रिपोर्टमध्ये येईलच.
अपघाताची माहिती मिळताच मी मुंबईतून तेथे पाऊन तासात कामोठे रुग्णालयात पोहोचले होते. मला कळालेली अपघाताची वेळ व प्रत्यक्ष घडलेली घटना याची चौकशी झाली पाहिजे. राजकारणापेक्षा समाजकारण हा त्यांचा पिंड होता. समाजकारणानेच त्यांचा बळी घेतला. दरम्यान, माजी आ. विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये लाखोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.