शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर उभारण्यास विरोध; गावाने कुटुंबावर टाकला सामाजिक बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 23:35 IST

Social Boycott : ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणल्यानंतर, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा जागी झाली.

ठळक मुद्दे किरकोळ वादातून किराणा, दळण, पाणी केले होते बंद बहिष्कार टाकल्याप्रकरणी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

- संतोषकुमार गवई

पातूर: दुर्गम आदिवासी गाव सोनुना येथे पोलीस पाटलाने त्यांच्या शेतातील सभागृहात मंदिर उभारण्यास विरोध केल्याने, गावातील काही लोकांच्या दबावात येत, ग्रामस्थांनी पोलीस पाटील रमेश कदम व कुटुंबीयावर सामाजिक बहिष्कार घातला होता. या प्रकरणी रविवारी चान्नी पोलिसांनी गावातील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ‘लोकमत’ने बहिष्कार टाकल्याचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा जागी झाली. ‘लोकमत’मुळे पोलीस पाटील कदम यांना न्याय मिळाला.

३५ वर्षांपासून सोनूना गावचे पोलीस पाटील म्हणून काम करणारे रमेश नारायण कदम यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पत्नी शशिकला कदम, आई गंगूबाई नारायण कदम, मुलगी गोकुळा, रिना, मुलगा प्रमोद कदम यांच्यावर ग्रामस्थांनी बहिष्कार घालून, किराणा, पीठगिरणीतून दळण आणि हातपंपावर पाणी भरण्यास मनाई केली होती, तसेच गावात कोणीही पोलीस पाटील कदम यांना नमस्कार केला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी कुणी बोलले, तर त्याला १० रुपये दंड ठोठावण्याचे फर्मान दिले होते. गावातील आरोपी पवन बबन चोंडकर, देवानंद बबन चोंडकर, भारत बबन गिऱ्हे, अमोल गणेश हांडे, माणिक किसन कदम, दिनकर गणेश कदम, धोंडू सीताराम गिऱ्हे, डिगांबर साधू चोंडकर, गजानन परशराम डाखोरे, सुधाकर आत्माराम गिऱ्हे, संजय किसन चोंडकर, अंकुश भाऊराव चोेंडकर आदींनी संगनमत करून ग्रामस्थांवर दबाव टाकून, पोलीस पाटील कदम यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला. त्यामुळे व्यथित झालेल्या कदम कुटुंबीयांनी तीन वेळा चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. अखेर १२ आरोपींविरुद्ध चान्नी पोलिसांनी रविवारी भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६(३४) व सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण अधिनियम २०१६ मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षणनुसार गुन्हा दाखल केला.

 

 

गेल्या दोन महिन्यांपासून चान्नी पोलीस ठाण्यात तीनदा तक्रार दिली, परंतु पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोपींची हिंमत वाढली. मात्र, ‘लोकमत’च्या वृत्तामध्ये आज आम्हाला न्याय मिळाला. ‘लोकमत’मुळे पोलिसांनी तातडीने १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

- रमेश कदम, पोलीस पाटील, सोनुना.

ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. ‘लोकमत’ने सामाजिक बहिष्काराची घटना उघडकीस आणली. त्यामुळे कदम कुटुंबाला न्याय मिळाला. पीडित कुटुंबाला सन्मानाचे जीवन बहाल करणे, ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे.

- कृष्णाजी चांदगुडे, राज्य कार्यवाहक, जातपंचायत मूठमाती अभियान

स्वतःलाच शासनकर्ते समजून गावातील काही लोक कायदा हातात घेतात. त्यातून सामाजिक बहिष्काराचे निर्णय घेतले जातात. या संदर्भात पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. सामाजिक बहिष्कार कारणे, सामाजिक स्वास्थ बिघडविणारी निंदनीय बाब आहे.

- नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिकPaturपातूर