शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

३०० गावांमध्ये ग्रामपरिवर्तनाची योजना, १५० गावांमध्ये नेमले मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:15 IST

राज्यातील खेड्यांचा शाश्वत विकास करण्यासाठी राज्य शासन आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला आतापर्यंत विविध कंपन्यांनी ३१ कोटी रुपयांची मदत दिली आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्यातील खेड्यांचा शाश्वत विकास करण्यासाठी राज्य शासन आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला आतापर्यंत विविध कंपन्यांनी ३१ कोटी रुपयांची मदत दिली आहे. ३०० गावांमध्ये ग्राम परिवर्तनाची ही अनोखी योजना सुरू झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज फाऊंडेशनची आढावा बैठक झाली.त्यावेळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, आनंद महिंद्रा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, जलसंधारण मंत्रीप्रा. राम शिंदे, उद्योजक रॉनी स्क्रूवाला, जरीना स्क्रूवाला, अजय पिरामल, अमित चंद्रा, पार्थ जिंदाल, शिखा शर्मा, संजीव मेहता, हेमेंद्र कोठारी, निखील मेस्वानी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पोपटराव पवार आदी यावेळी उपस्थित होते.या फाऊंडेशनच्या माध्यमातून खेड्यापाड्यात पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालये,स्वच्छता, समूह शेतीचा विकास, त्यासाठीचे प्रशिक्षण, शेतमालाचे मार्केटिंग, दुर्गम भागात टेलिमेडिसिनची सुविधा, डिजिटल कनेक्टिव्हीटी, घरकूल योजना, कौशल्य विकास, जलसंचय आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सीएसआर निधी, राज्य शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्यामधून गावांचा विकास करण्याची ही योजना आहे.३०० गावांपैकी १५० गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक नेमण्यात आले आहेत. ते फाऊंडेशन आणि ग्रामस्थ, ग्राम पंचायतींशी समन्वय राखून करतील आणि गावातच राहतील. एकूण २०० कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत.आतापर्यंत फाऊंडेशनला हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा ग्रूप, रिलायन्स फाऊंडेशन, अ‍ॅक्सिस बँक फाऊंडेशन, एचटी पारेख फाऊंडेशन, जेएसडब्ल्यू फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, स्वदेस फाऊंडेशन, सायस्का एलईडी यांनी ३१ कोटी रुपयांची मदत दिली आहे.या कंपन्यांनी येत्या तीन वर्षांत एकूण ९० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. १० कोटी रुपयांचा भार राज्य शासनाने उचलला आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार गावांचा विकास केला जाणार आहे.कॉर्पोरेट क्षेत्राने या कामी दाखविलेला उत्साह आणि दिलेला सहयोग निश्चितच कौतुकास्पद आहे. या माध्यमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळून राज्यात ग्रामविकासाची चळवळ अधिक गतिमान होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीशासन, कॉपोर्रेट आणि लोकांच्या सहभागातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेली ही चळवळ निश्चितच आदर्शवत आहे.- रतन टाटा, प्रख्यात उद्योगपती

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस