शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

गावनिहाय पाण्याचा ताळेबंद ;१३ जिल्ह्यांत पथदर्शी प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:46 IST

गावातील पाण्याचे स्रोत, भूजलपातळी, गावातील पीकपद्धती, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जाणार तेराशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये राबविणार उपक्रम

ठळक मुद्देतेराशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये राबविणार उपक्रम राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के क्षेत्र बेसॉल्ट खडकाचे लोकसंख्या, लागणारे पाणी, जनावरे, चारा व शेतीसाठी पाण्याचा गावनिहाय ताळेबंद

विशाल शिर्के - पुणे : राज्य सातत्याने पाण्याचे दुष्काळाला सामोरे जात आहे. पाणी वाटपावरून राज्या-राज्यामध्येच नव्हे, तर जिल्ह्यांतर्गतदेखील वाद निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे गावातील पाण्याची गरज गावातच भागविली जावी, या उद्देशाने केंद्र सरकारने गावनिहाय पाण्याचा ताळेबंद मांडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत गावातील पाण्याचे स्रोत, भूजलपातळी, गावातील पीकपद्धती, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जाणार आहे. पथदर्शी प्रकल्पांतर्गत राज्यातील १३३९ ग्रामपंचायतीमधील तब्बल १३७२ गावांची निवड करण्यात आली असून, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.‘दगडांच्या देशा’ अशीच राज्याची भौगोलिक स्थिती आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के क्षेत्र बेसॉल्ट खडकाचे आहे. पाणी साठवणक्षमता अवघी १ ते ३ टक्के इतकी आहे. रुपांतरित कठीण खडक १० टक्के असून, याचीही पाणी धारण क्षमता १ ते ३ टक्के आहे. शास्त्रीय पद्धतीने भेगा वाढवून ही क्षमता पाच टक्क्यांपर्यंत वाढविता येते. जवळपास ८ टक्के भूभाग स्तरित खडकांनी बनला असून, त्याची पाणी धारण करण्याची क्षमता साडेपाच टक्के आहे. गाळाचा साडेचार टक्के भाग असून, याची पाणी धारण करण्याची क्षमता सर्वाधिक पाच ते दहा टक्केइतकी आहे. राज्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, गावाची लोकसंख्या, लागणारे पाणी, जनावरे, चारा व शेतीसाठी लागणाºया पाण्याचा गावनिहाय ताळेबंद मांडला जाईल. त्यानुसार जलपुनर्भरण कसे करायचे, त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे ठरविण्यात येईल. तसेच, आवश्यकतेनुसार कृषी आणि मृद विभागाच्या सहकार्याने संबंधित गावात कोणते पीक घ्यावे, याची शिफारस केली जाईल........गावात पडणारा पाऊस, भूजलाचे प्रमाण, भूजलाचा होणारा उपसा, विविध कारणांसाठी होणारा पाण्याचा वापर यावरून गावाचा पाणी ताळेबंद मांडला जाईल. या ताळेबंदानुसार जलपुनर्भरण कामे करण्याबरोबरच व पीकपद्धतीचा सल्ला दिला जाईल. प्रथमच असा ताळेबंद मांडला जाणार असून, त्यासाठी राज्यातील १३३९ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्याबाबत येत्या १२ फेब्रुवारीला दिल्लीत बैठक होणार असून, त्यात तांत्रिक निकष निश्चित होतील. - कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा..........भौगोलिक रचनेमुळे भूजलक्षमतेत फारशी वाढ करणे शक्य नसली तरी योग्य व्यवस्थापन, जलपुनर्भरण व जमिनीवरील जलस्रोतांचे व्यवस्थापन याद्वारे गावाची संपूर्ण पाण्याची गरज भागविता येईल. त्यासाठीच अटल भूजल योजनेअंतर्गत पाण्याचा ताळेबंद मांडून त्याचे नियोजन केले जाणार आहे. .......या जिल्ह्यातील गावांमध्ये राबविणार अटल भूजल योजनाजिल्हा      तालुके                               गावांची           ग्रामपंचायतीची                 संख्या                                संख्यापुणे          बारामती, पुरंदर                    १२०                         १०१सातारा    माण, खटाव, वाई                   ११४                        ११३सांगली    जत, कवठेमहांकाळ,               ८९                           ८९    खानापूर, तासगावसोलापूर    माढा, मोहोळ, पंढरपूर            ५१                          ५०नाशिक    देवळा, सिन्नर                       १३०                        १२९अहमदनगर    राहता, संगमनेर              ८६                           ८६जळगाव    अंमळनेर, पारोळा, यावल     १२१                      १२१जालना    जालना, घनसांगवी, परतुर     ५०                          ४९लातूर    चाकूर, लातूर, निलंगा, रेणापूर   १३६                     १३३उस्मानाबाद    उस्मानाबाद, उमरगा      ५५                          ५५अमरावती    चांदुर बाजार, मोर्शी, वरुड    २१७                      २१३बुलढाणा    मोताळा                                  ६८                       ६८नागपूर    काटोल, नरखेड                     १३५                         १३२एकूण                                                  १३७२                      १३३९

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीgram panchayatग्राम पंचायतFarmerशेतकरीagricultureशेतीResearchसंशोधन