शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

विलास शिंदेंच्या मृत्यूचे पोलीस कॉलनीत पडसाद, मुख्यमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 18:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले होते. यावेळी पोलीस कॉलनीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला

- ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 31 - कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वारावरुन झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस शिपाई विलास शिंदे यांच्या मृत्यूचे पडसाद पोलीस कॉलनीत पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले होते. यावेळी पोलीस कॉलनीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला. 'पोलिसांना न्याय मिळालाच पाहिजे' अशा घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर देण्यात आल्या. आरोपीला जामीन मिळाला नाही पाहिजे अशी मागणीही यावेळी महिलांनी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी मात्र तेथून काढता पाय घेतला.
 
'ही दुर्देवी घटना असून आम्ही सर्व त्यांच्या दुखात सामील आहोत. सरकारकडून विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना पुरेपूर मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल', असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलं.
 
दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदे यांचं बुधवारी निधन झालं. गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदेंना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. संध्याकाळी सात वाजता त्यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.
 
(आणखी एक पोलीस शहीद झाला एवढंच...)
 (कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत देण्याची घोषणा)
 
(छायाचित्र - सुशील कदम)
 
दरम्यान, विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसंच त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाला नोकरी देण्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे.
 
(मारहाणीत जखमी झालेल्या पोलिसाची राज ठाकरे यांनी घेतली भेट)
 
वाहतूक पोलिसांकडून सध्या मुंबईतील सगळया वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली . २३ ऑगस्ट रोजी खार एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे यांनी तिथे आलेल्या दुचाकीस्वाराकडे त्याच्या गाडीची माहिती मागितली. 
 
पण शिंदे यांना माहिती देण्यास दुचाकीस्वाराने नकार दिला. दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यांनी दुचाकीस्वाराला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जायची धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या दुचाकीस्वाराने शिंदे यांना मारहाण सुरु केली. तिथे असलेले एक लाकूड उचलून त्याने शिंदे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. शिंदे रक्ताच्या थारोळयात तिथे कोसळले. ते पाहून भेदरलेला दुचाकीस्वार तिथून पसार झाला. 
 
(वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचे निधन, दुचाकीस्वाराने केली होती मारहाण)
 
गंभीर अवस्थेत त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागल्याने ते बेशुद्धअवस्थेत होते. अखेर आज बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी मालवणी येथून अटक केली. 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विलास शंदे यांना झालेल्या माराहणीचा उल्लेख केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यांनी रुग्णालयात जाऊन विलास शिंदे यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली होती.