संघाच्या फुलपॅन्टसाठी विजयादशमीचा मुहूर्त
By Admin | Updated: March 16, 2016 08:37 IST2016-03-16T08:37:11+5:302016-03-16T08:37:11+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खास ओळख असलेल्या खाकी हाफ पॅन्टऐवजी तपकीरी (ब्राऊन) रंगाची फुल पॅन्ट वापरण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी

संघाच्या फुलपॅन्टसाठी विजयादशमीचा मुहूर्त
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खास ओळख असलेल्या खाकी हाफ पॅन्टऐवजी तपकीरी (ब्राऊन) रंगाची फुल पॅन्ट वापरण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी विजयादशमीपासून होणार असल्याची माहिती संघाचे कोकण प्रांताचे संघचालक डॉ. सतीश मोढ यांनी दिली. त्याचप्रमाणे चामड्याच्या बूटाला पर्याय म्हणून स्वयंसेवकांना कॅनव्हासचे बूटही वापरता येतील, असेही मोढ
यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशातील शाखांत ३० टक्क्यांनी वाढ होऊन गेल्या वर्षभरात ५ हजार ५२४ नव्या शाखा सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)