शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
2
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
3
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
4
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
5
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
6
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
7
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
8
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
9
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
10
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
11
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
12
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
13
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
14
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
15
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
16
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
17
बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई
18
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
19
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
20
बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?

जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:01 IST

Jan Surakshan Bill: खरे तर त्या दिवशी सभात्याग करणे गरजेचे होते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Jan Surakshan Bill: अलीकडेच जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. राज्यपालांनी आता यावर स्वाक्षरी केली की, याचे रुपांतर कायद्यात होईल. या विधेयकावर हजारो हरकरी, सूचना आल्या होत्या. त्यामुळे यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल आल्यावर जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आले. परंतु, काँग्रेस नेत्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध न केल्याबाबत हायकमांड नाराज असून, विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांना नोटीस बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

विधिमंडळ परिसरात विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस विजय वडेट्टीवार यांना पक्षाच्या हायकमांडकडून आलेल्या नोटिसीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, हायकमांडची कुठलीही नोटीस मला आलेली नाही. हे विधेयक विधानसभेत मांडले गेले, त्यादिवशी नव्हतो. बँकेची निवडणूक होती. त्यामुळे जनसुरक्षा विधेयक आले, तेव्हा मला हजर राहता आले नाही.

विरोधकांनी सभात्याग करायला हवा होता

सभागृहात काँग्रेस नेत्यांनी योग्य बाजू मांडली नाही, असा सूर उमटत आहे. परंतु, ते योग्य नाही. काँग्रेस नेत्यांनी योग्य पद्धतीने बाजू मांडली. त्या दिवशीचे प्रोसिडिंग आम्ही हायकमांडकडे पाठवणार आहोत. प्रदेशाध्यक्षांनाही त्याची एक प्रत देणार आहोत. खरे तर विरोधकांनी त्या दिवशी सभात्याग करणे गरजेचे होते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. तोंड दाबण्याचे काम सरकार करत आहे.  प्रदेशाध्यक्षांनी एक नोट मला दिली होती. प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते की, या विधेयकाला कसा विरोध करायचा. बाकी आमदारांकडेही ती नोट होती. पण, सभागृहामध्ये हे विधेयक आले तेव्हा सरकारने सांगितले की, समितीमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे फार चर्चा करता येणार नाही. विधेयकाला जोरदार विरोध करायला हवा होता. महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधणे गरजेचे होते. मात्र ते झाले नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, जनसुरक्षा विधेयक मांडले, त्यावेळी आम्ही सभागृहात होतो. विजय वड्डेटीवार यांच्याशी माझे बोलणे होईल. आता माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. जनसुरक्षा विधेयक अचानक सभागृहात आले. त्यामुळे ते उपस्थित नसतील. जनसुरक्षा विधेयकाबाबत आम्ही नेमकी काय बाजू मांडली? हे आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवू. या विधेयकाच्या समितीमध्ये सूचना दिल्या होत्या. आम्ही जी काय माहिती आहे ती पक्षाला कळवू, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Maharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारVidhan Bhavanविधान भवन