शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:54 IST

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांना तपास वाढवला आहे. खंडणी प्रकरणी आरोप असलेला वाल्मीक कराड दोन दिवसापूर्वी सीआयडीकडे सरेंडर झाला.

Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याचेही नाव समोर आले. दोन दिवसापूर्वी वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला. त्याचदिवशी बीडमधील कोर्टासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने वाल्मीक कराड याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. वाल्मीक कराड सध्या बीड येथील पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, वाल्मीक कराड बाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. 

एकविरा देवीच्या मंदिर परिसरात फटाके फोडणे पडले महागात; मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी

"मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला. वाल्मीक कराड याचा पोलिस एन्काऊंटर करु शकतात, असं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, बीड मधील पोलिस ठाण्यात बेड घेऊन गेल्याचे फोटो समोर आले. याआधी पोलिस ठाण्यात बेडवर झोपल्याची माहिती नाही. कालच्या प्रकरणात पोलिसांसाठी असल्याच सांगितलं आहे. हे वाल्मीक कराडचे लाड आहेत. पोलिस कस्टडीमध्ये असताना त्याला झोपण्यासाठी घेऊन गेले आहेत का? या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. 

"मला तर विश्वसनीय लोकांकडून एक वेगळी माहिती मिळाली आहे. ती माहिती अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो. पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकाला वाचण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटर करु नका. मोठ्या आकाचा जाण्यासाठी जर या छोट्या आकाराचा वापर होत असेल तर हा पुरावा नष्ट करण्यासाठी काहीही होऊ शकते, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. 

'आज पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय व्हायला हवेत'

महायुती सरकारची आज पहिलीच कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ अशी घोषणा केली, आता आजच्या कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय घ्यावा. महायुतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याची घोषणा केली. आज पहिल्याच कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय होतो का ते पाहावे लागेल.

'अनेक नेते अजूनही कोमातच गेले आहेत. अजून काही नेत्यांनी मंत्रि‍पदाचा चार्ज घेतलेला नाही. मंत्र्यांमध्ये खाते वाटपावरुन वाद आहे. यामध्ये राज्याचे वाटोळे होऊ नये, असंही वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणcongressकाँग्रेस