पांढऱ्या पाठीच्या दुर्मीळ गिधाडांचे नाशकात दर्शन

By Admin | Updated: February 15, 2016 04:01 IST2016-02-15T04:01:19+5:302016-02-15T04:01:19+5:30

भारतातून नामशेष होणाऱ्या गिधाडांच्या प्रजातींचे नाशिकच्या आदिवासी भागात ग्रामस्थ व वनविभागाच्या प्रयत्नाने संवर्धन झाले असून, हरसूलजवळील खोरीपाडा येथील ‘गिधाड रेस्तरां’वर लांब

View of the rare vultures of white back | पांढऱ्या पाठीच्या दुर्मीळ गिधाडांचे नाशकात दर्शन

पांढऱ्या पाठीच्या दुर्मीळ गिधाडांचे नाशकात दर्शन

अझहर शेख,  नाशिक
भारतातून नामशेष होणाऱ्या गिधाडांच्या प्रजातींचे नाशिकच्या आदिवासी भागात ग्रामस्थ व वनविभागाच्या प्रयत्नाने संवर्धन झाले असून, हरसूलजवळील खोरीपाडा येथील ‘गिधाड रेस्तरां’वर लांब चोचीच्या व पांढऱ्या पाठीच्या तब्बल २३० गिधाडांचे दर्शन झाल्याने वनविभाग आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्यातून पक्षिप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकारांची पावले आता येथील ‘गिधाड रेस्तरां’कडे वळू लागली आहेत.
चार वर्षांपासून गिधाडांसाठी या परिसरात मृत जनावरे आदिवासी स्वयंस्फूर्तीने आणून टाकतात. त्यांना वनविभागाचे सहकार्य मिळते. पहिल्यांदा येथे १५० गिधाडांची नोंद झाली. त्यानंतर डोंगरमाथ्यांवर गिधाडांची वस्ती तयार होऊ लागली.
निसर्गातील पक्ष्यांच्या प्रजातींमधील अत्यंत महत्त्वाची प्रजाती व निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणून ओळखली जाणारी गिधाडे नामशेष होत चालली आहेत. भारतातही गिधाडांची संख्या कमालीने घटली असून, याचे मुख्य कारण जनावरांना उपचारादरम्यान अधिक प्रमाणात दिले जाणारे वेदनाशामक (डायक्लोफिनॅक) औषधी आहेत. त्या पार्श्वभूमीवर मृत जनावरे खाद्य म्हणून टाकून गिधाडांच्या संवर्धनाचा उपक्रम राबविला जात
आहे.चार वर्षांपासून खोरीपाड्यावर गिधाड संवर्धन सुरू आहे; मात्र या वर्षी प्रथमच पांढऱ्या पाठीच्या गिधाडांनी दर्शन दिल्याने संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कामाला मोठे यश मिळाले आहे. तब्बल २३० गिधाडे दोन दिवस मुक्कामी होती.
- शंकर शिंदे, अध्यक्ष, वनव्यवस्थापन समिती

Web Title: View of the rare vultures of white back