शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांच्या बाळाला धुळीत कसे ठेवू ? आ. सरोज अहिरे यांनी अश्रूंना करून दिली वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:54 IST

अडीच महिन्यांपूर्वी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात अडीच महिने वयाच्या त्यांच्या बाळासाठी (प्रशंसक) हिरकणी कक्ष उभारलेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाच महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन देवळाली (नाशिक)च्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे सोमवारी विधानभवनात आल्या. त्यांच्या बाळासाठी हिरकणी कक्ष तर राखीव ठेवला होता, पण त्यात कोणतीही सुविधा तर नव्हतीच शिवाय धूळ, अस्वच्छता असल्याने अहिरे कमालीच्या अस्वस्थ झाल्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी अश्रूंना वाट करून दिली. शेवटी यंत्रणा हलली आणि सायंकाळी हिरकणी कक्ष व्यवस्थित करण्यात आला. 

अडीच महिन्यांपूर्वी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात अडीच महिने वयाच्या त्यांच्या बाळासाठी (प्रशंसक) हिरकणी कक्ष उभारलेला होता. यावेळी मुंबईच्या अधिवेशनातही तसाच कक्ष असावा, असे पत्र त्यांनी चार दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानुसार कक्षाची व्यवस्था केली गेली पण सासू आणि बाळासह सरोज अहिरे त्या कक्षात गेल्या आणि तेथील दुरवस्था बघून त्या व्यथित झाल्या.

कक्षाची अशीच दुरवस्था राहणार असेल, तर मला नाशिकला परत जावे लागेल. माझे बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मी त्याला घेऊन आले. आजीच्या हाती त्याला देऊन सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचे मी पक्के केले होते, पण कक्षात प्यायला पाणी नाही, स्वच्छतागृह नाही, धूळ साचलेली आहे. माझ्या बाळाला आज ताप आहे, अशा परिस्थितीत या घाणीत त्याला कसे ठेवणार, अशी विचारणा त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन