शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

Vidhan sabha 2019 : विनोद तावडे, बावनकुळे ‘वेटिंग’वरच! खडसेंऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 06:51 IST

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी रात्री १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

- यदु जोशीमुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी रात्री १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, या यादीतही उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी महसूलमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावांचा समावेश नाही. तावडे व बावनकुळे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचे समजते. खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना खडसे वादग्रस्त ठरले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. खडसेंना विधानसभेची उमेदवारी नक्कीच मिळेल, असे मानले जात असताना बुधवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतही विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसे यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असा निरोप दिल्लीवरून आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील एकदोन जिल्ह्यांच्या राजकारणाचा विचार करता खडसे यांना जातीय आधारावर उमेदवारी देण्याची गरज आहे, असे समर्थन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले; पण त्यावर श्रेष्ठींनी अनुकूलता दर्शविली नाही. पर्याय म्हणून खडसेंच्या कन्या रोहिणी यांचा विचार करा असा निरोप वरून त्यांना आला. या बाबतचा नेमका निर्णय अद्याप व्हायचा आहे.उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम असून त्यांना तिकीट मिळावे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील असल्याचे समजते.रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. त्यांना उमेदवारी दिल्याने समाजाचीही नाराजी कमी होईल आणि खडसेंच्याच घरात उमेदवारी कायम राहील, असे समर्थन केले जात आहे.निर्णय दिल्लीत अडलातावडे यांचे बोरीवली मतदारसंघाचे तिकीट दिल्लीतच अडले आहे. तावडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. खडसे वा तावडे यांना उमेदवारी देणे हे प्रदेश भाजपच्या हातात असते तर निर्णय लवकर झाला असता; पण निर्णय दिल्लीत अडला असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. तावडे, बावनकुळे, खडसे या तिघांबाबत भाजपश्रेष्ठी धक्कातंत्र अवलंबणार, अशी चर्चा आहे.गणेश नाईकांना उमेदवारीबेलापूर मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या गणेश नाईकांना ऐरोलीमधून उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातून भाजपने गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना उमेदवारी दिली होती. पण आता तिथे स्वत: गणेश नाईक लढणार आहेत. भाजपने त्यांना ए-बी फॉर्म दिला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019