शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

Vidhan sabha 2019 : सुवर्णत्रिकोणातच नाटकं करायची काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 05:17 IST

निवडणूक परत एकदा वाजतगाजत आली आहे. घरीदारी, नाक्यावर, टीव्हीच्या पडद्यावर चर्चा सुरु झाली आहे. कुणी जुन्या घरातून नव्या घरात येत आहेत.

- सदानंद जोशीनिवडणूक परत एकदा वाजतगाजत आली आहे. घरीदारी, नाक्यावर, टीव्हीच्या पडद्यावर चर्चा सुरु झाली आहे. कुणी जुन्या घरातून नव्या घरात येत आहेत. तिकीटासाठी कुणी दाराशी थांबत, कुणी खिडकीतून डोकावत वाट पाहात आहेत. निकालानंतर नवा गडी, राज्य करेल किंवा जुना गडी परत राज्यावर येईल; पण प्रत्येकाने मतदान करण्यापूर्वी आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींचा विचार करायला हवा. शेतकरी वर्षानुवर्षे नुसता आश्वासनांवर जगतोय. त्यानं पिकविलेल्या मालाला भाव ठरवण्याचा त्याला अधिकार नाही. दलाल भाव ठरवणार, मालामाल होणार आणि आमचा बळीराजा दोरीत मान अडकवणार. त्याला चोवीस तास वीज कधी मिळणार? हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागणाºया महिलांची वणवण कधी थांबणार? माताभगिनींची ही वणवण थांबविण्याची आणि बळीराजाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची जबाबदारी आता सत्तेवर येणाºया सरकारची आहे. रस्ते चौपदरी, सहापदरी होत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. देशाचा प्रगतीपथ विस्तारायलाच हवा; पण मग ग्रामीण भागातले रस्ते खड्ड्यांतच राहणार का? सद्यपरिस्थितीत त्यांची एवढी दुर्दशा झाली आहे की त्यांना रस्ते तरी कसे म्हणायचे असा प्रश्न पडतो. गावखेड्यात राहणाऱ्यांची नशिबी भले चौपदरी रस्ते नसतील पण आहे त्यामार्गावरून तरी सुखानं प्रवास करता यायला हवा. निधी कमी पडू देणार नाही, हे घोषणेतले वाक्य आता कृतीत आणून ग्रामीण भागाला चांगले रस्ते मिळावेत, ही साधी अपेक्षा तरी पूर्ण करण्याची जबाबदारी घ्या. विद्यार्थ्यांच्या सुविधांकडेही लक्ष द्यायला हवे. त्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे हलके झाले की शासनाच्या डोक्यावरचा भारही हलका होईल.सामाजिक समस्यांसंदर्भातील अपेक्षा मांडत असतानाच सांस्कृतिक क्षेत्रातील अडीअडचणींचा ऊहापोह करणंही तितकचं आवश्यक आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात ऊर्जा आणि दिलासा देणाºया विविध कलांचे महत्त्व तितकेच अनन्यसाधारण आहे. सध्या उपलब्ध असलेल्या काही किंवा बºयाचशा नाट्यगृहांची अवस्था चिंताजनक आहे. नाट्यगृहांची स्वच्छता, अस्वच्छ टॉयलेट्स ह्यावर तक्रारी करून कलाकार थकले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक ह्यातच नाटक शिल्लक राहिलंय काय, असा प्रश्न येतो. बाहेरगावालाही नाट्यगृहांची स्थिती याहून वेगळी नाही. मग कलाकारांनी नाटकांचे दौरे ह्या सुवर्णत्रिकोणातच करुन बाहेरगावी जाणे थांबविले तर त्यांचा काय दोष? तेव्हा आधी हातात आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं आणि नवीन नाट्यगृहं आता ३०० ते ३५० प्रेक्षक बसतील अशीच बांधणं हिताचं आहे.पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील मॉल्समध्ये पाच-सहा छोटी सिनेमाघरं आहेत तेथेच एक खास नाटकासाठी म्हणून मिनी थिएटर करता येईल का, याचाही विचार गांभीर्याने करायला हवा. नाट्यगृहांमध्ये दिसेनासी झालेली तरुणाई कदाचित अशा मॉलमधील अत्याधुनिक थिएटरमध्ये येऊ लागेल. हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या बक्षिसांच्या रकमेत आता बºयापैकी वाढ झाली आहे, परंतु नाटकाच्या सादरीकरणापोटी मिळणारी रक्कम पुरेशी नाही. त्यात अजूनही लक्षणीय सुधारणा व्हायला हवी. प्रायोगिक नाटक चळवळीच्या पाठिशी शासनाने उभे राहायला हवे. कारण ही चळवळ नाटक जिवंत ठेवणारी आहे. यातूनच रंगभूमी, चित्रपटसृृष्टीला अनेक सक्षम कलावंत लाभले आहेत. सिनेमॅक्स मराठी चित्रपटांना, त्यांना मिळणाºया शोबाबत प्राधान्य द्यायला हवे. तसेच राष्टÑीय चित्रपट पुरस्कार विजेते मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी. महत्त्वाचे म्हणजे, सिनेमा आणि नाटक यावर सेन्सॉरचे वाढलेलं अनावश्यक ओझं आता कमी करा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.(लेखक हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019