शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

Vidhan sabha 2019 : उद्धव 'वर्षा'वर गेले अन् युतीचा मार्ग मोकळा झाला; फिफ्टी-फिफ्टी गुंडाळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 09:19 IST

लोकसभा निवडणुकीचा युतीचा फॉर्म्युला जाहीर करताना विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष फिप्टी-फिप्टी जागा (प्रत्येकी १४४) लढतील, असे भाजप व शिवसेनेच्याही शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर केले होते. तथापि...

- यदु जोशी मुंबई : लोकसभा निवडणुकीचा युतीचा फॉर्म्युला जाहीर करताना विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष फिप्टी-फिप्टी जागा (प्रत्येकी १४४) लढतील, असे भाजप व शिवसेनेच्याही शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर केले होते. तथापि, आता भाजपच्या वाट्याला १६४ जागा आल्या असून शिवसेना १२४ जागा लढेल. भाजप आपल्या कोट्यातून लहान मित्र पक्षांना जागा देईल. शिवसेनेला झुकवण्यात भाजपला यश आल्याचे त्यावरून स्पष्ट होते.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्र परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा (भाजप २५, शिवसेना २३) फॉर्म्युला मुंबईत पत्र परिषदेत जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी विधानसभेत दोन्ही पक्ष समसमान जागा लढतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात शिवसेनेला १२४ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. याचा अर्थ २० जागा त्यांना सोडाव्या लागल्या.लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजप आता राज्यात स्वबळावरच लढणार, असे चित्र निर्माण झाले होते. तथापि, मुख्यमंत्री फडणवीस हे सुरुवातीपासून युतीबाबत आग्रही होते. २०१४ मध्ये भाजपने १२२ तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या आणि युतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचे भाजपने सिद्ध केले. यावेळच्या जागावाटपानेही तेच अधोरेखित केले आहे. भाजप आपल्या वाट्याला आलेल्या १६४ पैकी रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना या लहान पक्षांना दहाएक जागा देईल, अशी शक्यता आहे.अलिकडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री गणेश नाईक यांना मंदा म्हात्रे यांच्या जागी बेलापूरमध्ये उमेदवारी हवी होती. शिवसेनेने या जागेवर हक्क सांगितला. नाईक नकोतच अशी भूमिकाही घेतली. शेवटी जागा भाजपकडेच ठेवायची आणि तिथे नाईक यांच्याऐवजी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच संधी द्यायची असा तोडगा काढण्यात आला. ठाण्याची जागा भाजपने शिवसेनेला दिली नाही.उद्धव ‘वर्षा’वर गेले अन् युतीचा मार्ग मोकळाशिवसेनेने १२६ जागांचा आग्रह धरला आणि भाजप १२० पेक्षा एकही जागा जास्त द्यायला तयार नव्हता. तसेच तीनचार जागांबाबत आणि उमेदवारांबाबतही वाद होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल रात्री १२ च्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. रात्री अडीचपर्यंत बसून दोघांनी वादाचे विषय निकाली काढले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना