शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Vidhan Parishad Result: विधान परिषदेचा पहिला निकाल हाती; एकनाथ खडसेंसह हे उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 21:20 IST

विधान भवनात सेंट्रल हॉलमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यावेळी सर्वच पक्षाचे बहुतांश आमदार याठिकाणी बसले होते.

मुंबई - राज्यसभेच्या निकालानंतर विधान परिषदेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. विधान परिषदेत निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजपाच्या २ आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतला. परंतु हा आक्षेप फेटाळल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली. या मतमोजणी छाननीमध्ये २८५ मते वैध ठरवण्यात आली आहे. 

विधान भवनात सेंट्रल हॉलमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यावेळी सर्वच पक्षाचे बहुतांश आमदार याठिकाणी बसले होते. या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते. या निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेनेचे सचिन आहिर, आमश्या पाडवी, भाजपाचे प्रविण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाले आहेत.विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार उभे केले होते. तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत पाहायला मिळत होती. परंतु महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीलाही दुसऱ्या उमेदवारांचा मतांचा कोटा पूर्ण करण्यास ४-५ मतांची गरज होती. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. 

काँग्रेसचा आक्षेप, मतमोजणीला विलंबविधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झाले. एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले. तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांना हायकोर्टाने मतदानाची परवानगी नाकारली तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. जगताप, मुक्ता टिळक यांनी मदतनीसाच्या माध्यमातून हे मत दिले असा आक्षेप काँग्रेसनं घेतला. त्यासाठी काँग्रेसनं राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे विधान परिषदेच्या मतमोजणीला विलंब झाला. निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळलाभाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील याची खात्री आहे असा दावा भाजपा नेते करत होते. काँग्रेसचे आक्षेप राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवत मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश दिले. सुकृतदर्शनी आक्षेप योग्य नसल्याने मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असेल असं भाजपाचे आमदार राहूल नार्वेकर यांनी सांगितलं. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकeknath khadseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस