विधान परिषदेची आज निवडणूक, प्रसाद लाड की दिलीप माने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:11 AM2017-12-07T04:11:02+5:302017-12-07T04:11:34+5:30

विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी गुरुवारी (दि.७) होणा-या पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेनेचे प्रसाद लाड आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिलीप माने असा सामना होत असला...

Vidhan Parishad elections today, Prasad Lad ki Dilip Mane? | विधान परिषदेची आज निवडणूक, प्रसाद लाड की दिलीप माने?

विधान परिषदेची आज निवडणूक, प्रसाद लाड की दिलीप माने?

Next

मुंबई : विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी गुरुवारी (दि.७) होणा-या पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेनेचे प्रसाद लाड आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिलीप माने असा सामना होत असला, तरी पक्षीय संख्याबळाचा विचार करता लाड यांचे पारडे जड आहे. नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी होणा-या निवडणुकीचा निकाल उद्याच जाहीर होईल. भाजपाचे १२२, शिवसेनेचे ६३ आमदार आहेत. दोघांचे मिळून संख्याबळ १८५ होते. सात अपक्ष आमदार भाजपासोबत आहेत. युतीचे संख्याबळ १९२ होत असले, तरीे लाड यांना २०० हून अधिक मते मिळावीत, यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. सेनेच्या एकाला मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांचे संख्याबळ ६२ आहे. काँग्रसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१ मिळून ८३ आमदार आहेत. त्यात राष्ट्रवादीचे दोघे तुरुंगात आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ८१ असेल. लाड यांनी भाजपा-शिवसेना-अपक्ष आमदारांना आज पंचतारांकित हॉटेलमध्ये भोजन दिले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली.

... यांनी गमावला मतदानाचा अधिकार
शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी उच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. ते या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असले, तरी त्यांना उद्याच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसेल.छगन भुजबळ आणि रमेश कदम हे राष्टÑवादीचे दोन आमदार सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदानात भाग घेऊ शकणार नाहीत.

Web Title: Vidhan Parishad elections today, Prasad Lad ki Dilip Mane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.