शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 10:12 IST

Vidhan Parishad Election Updates: विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. कोणाचे आमदार फुटणार, कोणाचे क्रॉस व्होटिंग करणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या असून आतापर्यंत भाजपासह इतर पक्षांच्या ३५ आमदारांनी मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार हॉटेलवरून विधान भवनाकडे निघाले आहेत. तर अजित पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदारही वाटेवर आहेत. 

विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे. भाजपाचे आमदार कुलाब्याच्या ताज प्रेसिडन्सीमध्ये तर शिवसेनेचे बांद्राच्या ताज लँड्समध्ये, उद्धव ठाकरेंचे परळच्या आयटीसी ग्रँड मराठा आणि अजित पवार गटाचे अंधेरीच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. सुरुवातीच्या सत्रात भाजपाचे आमदार मतदान करणार आहेत. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार मतदान करणार आहेत. मते फुटू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. 

दरम्यान, नवाब मलिक देखील विधानभवनात पोहोचले आहेत. मलिकांनी काल शरद पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यांनी शरद पवार, जयंत पाटलांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. यामुळे मलिक अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करतात की शरद पवारांच्या याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

हे आहेत रिंगणात

भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे काँग्रेस : प्रज्ञा सातव उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर शेकाप : जयंत पाटील 

मतांचे गणित काय...भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात. शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत.  शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वत:च्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे १५ आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे १६ मते आहेत. त्यांना आणखी सात मतांची जुळवाजुळव करावी लागेल.  अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्यांना आणखी सात मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे. उद्धवसेनेकडे १५ आमदार आहेत, त्यांना आणखी ८ मते लागतील. एक अपक्ष त्यांच्यासोबत आहेत. काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडे ३७ मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ २३ मते लागतील. याचा अर्थ काँग्रेसकडे १४ मते अतिरिक्त आहेत, ती कुठे वळतात यावर बरेच अवलंबून असेल.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना