शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणूक: मविआ की भाजपा, दहावी जागा कुणाच्या खिशात? आज घमासान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 07:17 IST

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे.

 मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. ‘शेरास सव्वाशेर मिळतोच’ असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत राज्यसभा निवडणुकीचा बदला यावेळी घेणार असे जणू आव्हानच दिले आहे.

आषाढी वारीला सोमवारी सुरुवात होत आहे. विधान परिषदेच्या वारीत विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता आहे. रविवार असूनही राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या आघाडीच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली. दरम्यान, फोर सीझन हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते व आमदारांशी चर्चा  केली.

देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात जाऊन मार्गदर्शन केले. ‘चिंता करू नका, आपल्याला विजय सोपा नसला तरी अशक्यप्राय काहीही नाही’ या शब्दांत विश्वास व्यक्त केला.  अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचा सल्ला दिला. 

प्रसाद लाड विरुद्ध भाई जगताप सामना- काँग्रेसला दुसरी जागेसाठी किमान ८ मते हवी आहेत. भाजपला स्वत:चे संख्याबळ व सोबतचे अपक्ष मिळून ११२ एवढे संख्याबळ असल्याने पाचवी जागा निवडून आणण्यासाठी तब्बल १८ मतांची गरज आहे. - लहान पक्ष, अपक्षांशिवाय आघाडीतील काही मते गुप्त मतदानाचा फायदा घेत फोडण्यावर भाजपचा भर आहे. भाजपमध्ये आमचे संबंध आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा देत राष्ट्रवादीने भाजपचीही काही मते फुटू शकतात असे सूचित केले आहे. भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप असा दहाव्या जागेसाठीचा सामना आहे. भाजपचे आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला तर उद्या काय ते दिसेलच असे भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.- राज्यसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. त्यातील काही अपक्ष व लहान पक्षांचे आमदार यावेळी महाविकास आघाडीसोबत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 

भाजपचे आमदार मला मत देणार नाहीत : खडसेभाजपमध्ये दोनच नाहीत तर बरेच आमदार माझे समर्थक आहेत पण, ते मला मतदान करतील असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. 

 कोण कोण सोबत? - संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे या तीन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला मत दिले नाही असा आरोप शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी केला होता. हे तिन्ही आमदार उद्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आहेत. समाजवादी पार्टीदेखील महाविकास आघाडीसोबत आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने अद्यापही पत्ते उघडलेले नाहीत. - दोन आमदार असलेल्या एमआयएमने भूमिका जाहीर केलेली नाही पण, मी एकनाथ खडसे यांना मत देणार असे या पक्षाचे आमदार फारुख शहा म्हणाले.- मतदानाला सोमवारी सकाळी ९ वाजता विधानभवनात सुरुवात होईल. रात्री ८ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.

यांच्या भाग्याचा फैसलाशिवसेना -     सचिन अहीर,    आमशा पाडवी भाजप   -   प्रवीण दरेकर, राम शिंदे,    श्रीकांत भारतीय,    उमा खापरे, प्रसाद लाड राष्ट्रवादी   -   रामराजे नाईक निंबाळकर,    एकनाथ खडसे काँग्रेस- चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVidhan Parishadविधान परिषदMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा