शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Vidhan Parishad Election Result: अकोल्यात भाजपाने ऐनवेळी फिरवलं 'आकड्यांचं गणित'; गटबाजी, फाटाफुटीमुळे शिवसेना विजयापासून 'वंचित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 11:09 IST

Vidhan Parishad Election Result: महाविकास आघाडीची मतं फुटली; भाजपच्या खंडेलवाल यांचा शिवसेनेच्या बाजाेरियांना धक्का

- राजेश शेगाेकारअकाेला : अकाेला, वाशीम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालात नवीन विक्रम घडला आहे. भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी तब्बल तिन वेळा विजयी झालेल्या शिवसेनेच्या गाेपीकिशन बाजाेरिया यांचा १०९ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. खंडेलवाल यांच्या विजयात महाविकास आघाडीचे फुटलेली मते माेलाची ठरली आहेत. खंडेलवाल यांना ४४३ तर बाजाेरिया यांना ३४३ मतं मिळाली. तर ३१ मतं अवैध ठरली.

खंडेलवाल यांचा विजय या मतदारसंघासाठी नव्या विक्रमाची नाेंद करणारा ठरला आहे. हा मतदारसंघ १९८८ पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात हाेता तर शिवसेनेचे उमेदवार गाेपीकिशन बाजाेरिया यांची तिसरी टर्म सुरू हाेती. त्यामुळे बाजाेरिया व शिवसेना यांचा सलग विजयाच्या नव्या विक्रमाला खंडित करत  भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी विजयाचे कमळ फुलविले तसेच  बाजाेरिया यांच्यासारख्या दिग्गजाला पराभूत करण्याच्या विक्रमाची नाेंद हाेईल.अकाेला, वाशीम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गत चारही निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रित हाेती. यावेळी मात्र युती दुभंगली असल्याने, भाजपने ताेडीस ताेड उमेदवार देऊन मतदारसंघात चुरस वाढविली हाेती. अकाेला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत विखुरलेल्या या मतदारसंघांत शिवसेनेकडे कधीही मतदारांचं बहुमत राहिलेले नाही. तरीही विद्यमान आमदार गाेपीकिशन बाजाेरीया यांनी विजयाचा ‘चमत्कार’ घडवून आला हाेता या पृष्ठभूमीवर यावेळी मात्र त्यांची चांगलीच दमछाक झाली.  तर भाजपचे खंडेलवाल यांनी ही निवडणूक अतिशय शांतपणे अन् मुत्सद्दीगिरीने लढली. शेवटच्या दिवसापर्यंत दाेन्ही उमेदवारांनी आपल्या पत्त्यातील ‘अर्थ’ मतदारांना सांगितला नव्हता, ऐन वेळी खंडेलवाल यांनी ‘आकडयांच्या’ गणितात बाजाेरिया यांना जेरीस आणल्याची चर्चा आहे. 

बाजाेरिया विजयापासून ‘वंचित’वंचित बहुजन आघाडीने दाेनपैकी एकाही उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिला नव्हता. मतदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीनुसार मतदान करावे, असे आदेश वंचितच्या नेतृत्वाने दिले हाेते. त्यामुळे वंचितचा काैल काेणाकडे झुकला, हा प्रश्नच हाेता दरम्यान, या निवडणुकीच्या निकालात वंचितचे बहूतांश मतदार हे भाजपकडे झुकल्याचे दिसून आले. या निवडणूकीच्या दरम्यानच अकाेला जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात यावी, अशा मागणीचे पत्र वंचितचा सत्तापक्ष वगळता विरोधी गटाच्या २९ सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सादर केले होते. त्या पत्रावर जिल्हा परिषदेतील भाजपच्या पाच सदस्यांच्याही स्वाक्षऱ्या होत्या, परंतु त्या पत्रावरील आमच्या स्वाक्षऱ्या ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे पत्र भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने अध्यक्षांना देण्यात आले. ही घडामाेड पाहता, वंचितचा कल भाजपकडे झुकला असावा, अशी चर्चा आहे.

 अंतर्गत गटबाजीचा फटकामहाविकास आघाडीतील घटक पक्षातच कायम धुसफूस आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा देत, या आधीच स्थानिक स्तरावर वेगळी चूल मांडली हाेती. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा याच मतदारसंघात सलग चौथ्यांदा पराभव झाला हाेता त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसही आपल्या घडयाळाचे काटे काेणत्या दिशेने फिरवेल यांची शंका हाेती.या साेबतच शिवसेनेतच अंतर्गत गटबाजी चांगलीच जाेर धरली आहे. या गटबाजीचाही फटका शिवसेनेला बसला. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची मते फुटल्याचे निकाल स्पष्टपणे दर्शवत आहे. 

असे हाेते मतदार-भाजप २४६काँग्रेस १९१शिवसेना १२४राष्ट्रवादी ९१वंचित ८६एमआयएम ७अपक्ष व इतर आघाडी ७७

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा