शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती; भाजपानं काँग्रेसच्या आक्षेपाला दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:10 IST

काँग्रेसकडून आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आले

मुंबई - राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या मतदानासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली होती. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु आता काँग्रेसनंभाजपाच्या २ आमदारांवर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या आक्षेपावर निर्णय होत नाही तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार नाही. 

काय आहे आक्षेप? काँग्रेसकडून आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आले. या दोन्ही आमदारांच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीला सहकार्यासाठी मतदानासाठी घेतले. हे दोन्ही आमदार सही करू शकत होते मग मतदानाला दुसऱ्याला का पाठवले? यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला आहे. यावर निर्णय होईल असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

निवडणूक आयोगाची घेतली परवानगी - भाजपाकाँग्रेसनं घेतलेले आक्षेप बालिशपणाचे, ३ दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारे परवानगी घेतली आहे. लेखी परवानगी घेतली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही असेच मतदान घेतले होते. नियमानुसार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी मतदान केले. मग आताच्या निवडणुकीत आक्षेप का? यात कुठलीही अडचण नाही. निवडणूक अधिकारी याबाबत निर्णय देतील. टाईमपास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा म्हणून हा आक्षेप घेण्यात आला आहे असा टोला भाजपा नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेसला लगावला आहे. 

हा तर असंवेदनशीलतेचा कळस - देवेंद्र फडणवीस काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी हा तर असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं म्हणत काँग्रेसच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे तर राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही मतदानावर आक्षेप घेतले होते. या निवडणुकीत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मतदान केले होते. परिस्थिती बिकट असताना दोन्ही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु महाविकास आघाडीने खालच्या पातळीचं राजकारण सुरू केले आहे. काँग्रेसनं या दोघांच्या मतदानावर आक्षेप घेतला ते दुर्देवी आहे असं भाजपा नेते संजय कुटे यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा