शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: धाकधूक वाढली, खलबतांना जोर, सोमवारी चमत्कार, अजित पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 08:06 IST

Vidhan Parishad Election: विधान परिषद चमत्कार कुणाच्या बाजूने घडेल हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्यांची विकेट जाईल, असे विधान करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीची उत्कंठा आणखीच वाढविली.

 मुंबई : विधान परिषद चमत्कार कुणाच्या बाजूने घडेल हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्यांची विकेट जाईल, असे विधान करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीची उत्कंठा आणखीच वाढविली. या निवडणुकीसाठी खलबते, बैठकांना जोर आला असून, चारही मोठ्या पक्षांचे आमदार पंचतारांकित हॉटेलांमध्ये मुक्कामी आहेत. 

महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्र्यांचा कल आहे. त्यानुसार आमदारांच्या मतांच्या कोट्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही, असा निर्वाळा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

क्रॉसव्होटिंग होणार नाही याची दक्षता घेतानाच लहान पक्ष व अपक्षांची मते वळविण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ‘अर्थ’पूर्ण हालचाली मोठ्या प्रमाणात घडत असल्याची चर्चा आहे. २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असून, एका उमेदवाराची विकेट निश्चित आहे. भाजपचे आमदार ताज प्रेसिडेन्सी, काँग्रेसचे आमदार फोर सीझन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ट्रायडंट व शिवसेना आमदार वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.

गाठीभेटींनाही वेग- काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सकाळी शरद पवार यांना भेटले. मविआचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. - भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांनी आ. हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन केले. -आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांशी संवाद साधला. मतदान करताना कोणती खबरदारी घ्यायची याचे मार्गदर्शन सर्वच पक्ष करीत आहेत. 

पहिल्या पसंतीला महत्त्व- कोणत्याच पक्षाकडे अतिरिक्त मते शिल्लक राहत नाहीत, त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते आपापल्या उमेदवारांना द्यावी लागतील. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २६ मतांचे गणित जुळवण्याच्या कामाला सर्व पक्ष लागले आहेत. - शिवसेनेसोबतच्या अपक्ष आमदारांची पळवापळवी दोन मित्र पक्षच करीत असल्याचेही चित्र आहे. मविआतील तीन पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक रविवारी होईल, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

यांचे पत्ते उघड नाहीततीन आमदार असलेली बविआ व प्रत्येकी २ मते असलेले एमआयएम व समाजवादी या पक्षांनी अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. राज्यसभेत एमआयएमने काँग्रेसला, तर सपाने मविआला पाठिंबा दिला होता. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना