शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Vidhan Parishad Election: लागली पैज! प्रसाद लाड यांना ३२ मतं मिळतील, दरेकरांनी स्वाक्षरी करून दिला कागद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:55 IST

Vidhan Parishad Election: भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यामध्ये प्रसाद लाड यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे

मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली म्हणून काँग्रेसने भाजपाच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला. पण आता काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला असून काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याच दरम्यान प्रसाद लाड यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे. 

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) आणि राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांच्यामध्ये प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे. प्रसाद लाड यांना ३२ मतं मिळतील असं म्हटलं आहे. दरेकरांनी स्वाक्षरी करून बनसोडे यांना एक कागद दिल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसनं असंवेदनशीलतेचा कळस गाठला अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेसचे आरोप बेकायदेशीर असून परवानगी घेऊनच मतदान केल्याचं संजय कुंटे यांनी म्हटलं आहे. 

भाजपाच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या अंथरूणाला खिळून असलेल्या आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेऊन काँग्रेसने बेशरमपणाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. निवडणूक आयोग काँग्रेसच्या या निरर्थक आक्षेपाला दाद देणार नाही अशी अपेक्षा आहे असं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधान परिषदेसाठी मतदान करू देण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. कोर्टानं दोघांनाही मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. 

 

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाPrasad Ladप्रसाद लाडPoliticsराजकारणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक