शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad: "महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल", काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं मोठी खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 08:19 IST

Vidhan Parishad Election 2022: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात भाजपानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. त्यानंतर सत्ताधारी पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आहे.

Vidhan Parishad Election 2022: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात भाजपानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. त्यानंतर सत्ताधारी पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आहे. शिवसेनेत मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आता काँग्रेसनंहीमहाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत संकेत देण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहायका का? याचा आता विचार करावा लागेल असा निर्वाणीचा इशारा काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिला आहे. निवडणूक निकालानंतर नाराजीनाट्य, एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'; बैठकीला अनुपस्थित राहणार?

"काँग्रेसचा दलित मागासवर्गीय पहिल्या पसंतीचा उमेदवार पडतो हे दुर्दैवी आहे. आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. वेळ अशी आली आहे की सरकारमध्ये राहायला हवं की नको याचा विचार करायला हवा. कुठली मतं कुठं गेली हे सांगणं योग्य नाही. पण ती फुटलीत हे नक्की. किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून समर्थन देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. प्रत्येक पक्षाला पक्षवाढीची मुभा राहिल असं ठरवण्यात आलं होतं. आज आमच्या समर्थनामुळे हे सरकार चालू आहे. पण आमच्या पक्षातच नाराजी आहे हे निकालावरुन स्पष्ट झालं आहे. यावर बैठक घेऊन विचार करू. सरकारमध्ये राहून काँग्रेसला काय मिळतंय हे पाहणं देखील महत्वाचं आहे. आमचा पहिल्या पसंतीचा उमेदवार पडतो म्हणजे फक्त आमचीच जबाबदारी नाही. सर्वांची जबाबदारी आहे. दिल्लीचे नेते निर्णय घेतील", असं काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले. 

नसीम खान यांनी काँग्रेसमधील नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस आता बाहेर पडणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. भाजपानं दिलेल्या धक्क्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेचीही मतं फुटली आहेत. त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. पण त्याआधीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत शिंदे समर्थक १२ आमदारांशी देखील संपर्क होऊ शकत नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडते की काय अशी चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे नाराज असून ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे आपला सहकारी पक्ष काँग्रेस देखील नाराज असल्यानं सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक