VIDEO : सातारकरांनी अनुभवली ढगांची अद्भुत सफर

By Admin | Updated: May 31, 2017 16:09 IST2017-05-31T15:42:21+5:302017-05-31T16:09:45+5:30

ऑनलाइन लोकमत सातारा, दि. 31 - सातारकरांसाठी  बुधवारचा दिवस विलक्षणीय ठरला. यवतेश्वर घाटातून कास पठाराकडे फिरायला गेलेल्या पर्यटकांना एक ...

VIDEO: A wonderful journey of clouds that Satarkar experienced! | VIDEO : सातारकरांनी अनुभवली ढगांची अद्भुत सफर

VIDEO : सातारकरांनी अनुभवली ढगांची अद्भुत सफर

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 31 - सातारकरांसाठी  बुधवारचा दिवस विलक्षणीय ठरला. यवतेश्वर घाटातून कास पठाराकडे फिरायला गेलेल्या पर्यटकांना एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. सातारा शहराच्या आसपास अवकाशात जणू ढगांचा महापूर आल्याचा भास अनेकांना झाला.
 
सातारा शहर दरीत वसलेलं. हे शरह चारही बाजूंनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा वेढलेले. त्यामुळं इथला निसर्ग नेहमीच आगळा-वेगळा; परंतु बुधवारचं निसर्ग दृश्य सातारकरांसाठी खासच ठरलं. 
 
सज्जनगड-परळी खो-यातून आलेल्या पांढ-याशुभ्र ढगांनी यवतेश्वरच्या घाटातून सातारा शहराकडे जणू झेप घेतली. ढगांचा हा महापूर एखाद्या कोसळणा-या धबधब्यासारखा दिसत होता. हे दृश्य पाहण्यासाठी शेकडो सातारकर यवतेश्वर घाटात मोठ्या उत्साहाने गेले. 
 
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानं सातारा शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यात हे ढगांचे अनोखे दृश्य. ढगांचा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी झाली होती.  

 

https://www.dailymotion.com/video/x8450bt

Web Title: VIDEO: A wonderful journey of clouds that Satarkar experienced!