VIDEO: अकोला कृषी विद्यापीठात वॉटर बँक , वॉटर एटीएम
By Admin | Updated: July 30, 2016 19:52 IST2016-07-30T19:23:19+5:302016-07-30T19:52:31+5:30
कोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नसल्याने यावर्षी वॉटर बँक आणि वॉटर एटीएम हा नवीन प्रयोग केला आहे

VIDEO: अकोला कृषी विद्यापीठात वॉटर बँक , वॉटर एटीएम
>राजरत्न शिरसाट / ऑनलाइन लोकमत -
अकोला, दि. 30 - अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नसल्याने या कृषी विद्यापीठाने पाणी बचत व वापर, याविषयी अनेक प्रयोग केले असून, यावर्षी वॉटर बँक आणि वॉटर एटीएम हा नवीन प्रयोग केला आहे. शेतीसाठी या पद्धतीने पाणी वापराचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर परिणाम होत आहेत. २००५-०६ च्या दुष्काळात पाणीच नसल्याने येथील संशोधनावर परिणाम झाले, त्यामुळे येथील काही संशोधन प्लॉट नागपूर व जेथे पाणी उपलब्ध असेल तेथे तयार करण्यात आले होते. मागीलवर्षीही पाऊस नसल्याने हीच परिस्थिती निर्माण झाली होती.
या कृषी विद्यापीठाने याअगोदर वॉटर मॉडेल तयार केले आहे. आता वॉटर बँक म्हणजेच एक तळे तयार केले असून, या तळ्यातून एटीएमसारखे पाणी पिकांना वापरता येईल. तद्वतच कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, कर्मचाºयांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.
५५ बाय २५ आकाराचे हे तळे असून, यावर्षी चांगला पाऊस असल्याने हे तळे पूर्णत: पाण्याने भरले आहे. या तळ्यात आजमितीस ४ हजार घनमीटर पाणी आहे. विशेष म्हणजे या तळ्यात पाणी साठवण्यासाठी व उपसण्यासाठीचे विशेष प्रयोग करण्यात आले आहेत. ओडीशा येथील कृषी विद्यापीठाच्या धरतीवर या अगोदर येथे प्रयोग करण्यात आले. या तळ्यात सबमर्सिबल पंप बसविण्यात आले असून, संपूर्ण विद्यापीठाचे नव्हे; पण लगतचे संशोधन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो.
वॉटर बँक आणि वॉटर एटीएम या धरतीवर तळे बांधण्यात आले आहेत. या तळ्यातील पाण्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली असून, उन्हाळ्यात या पाण्याचा एटीएमसारखा वापर करण्यात येईल.
- डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, तथा मुख्य शास्त्रज्ञ कोरडवाहू संशोधन प्रक्षेत्र,
डॉ.पंदेकृवि, अकोला.