Video Viral; leader Caught in camera during | अश्लील व्हिडिओ व्हायरल; लोकप्रतिनिधींच्या रंगेल चाळ्यांनी बीडमध्ये खळबळ
अश्लील व्हिडिओ व्हायरल; लोकप्रतिनिधींच्या रंगेल चाळ्यांनी बीडमध्ये खळबळ

मुंबई - राज्याच्या राजकारणात कायमच दबदबा राखणारा बीड जिल्हा राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच घटनेने चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींच्या अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे लोकप्रतिनिधी एकाच पक्षातील असल्याचे समजते. 

व्हायरल व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजचा असून हे फुटेज 16 एप्रिल 2019 रोजीचे आहे. हे सीसीटीव्ही फुटेज जिल्ह्यातील कुठले आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून व्हिडिओ 10 मिनिटांपेक्षा अधिक कालावधीचा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा पुरुष स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणारा असून महिला जिल्ह्यातील ख्यातनाम राजकीय पुढारी असल्याचे समजते. 

व्हिडिओतील पुरुष जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या जवळचा मानला जातो. लोकसभा निवडणुकीच्या काळातील हा व्हिडिओ आहे. तब्बल सहा महिन्यानंतर हा व्हिडिओ बाहेर आल्यामुळे नेत्याची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणण्यासाठी व्हिडिओ दडवून ठेवला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान महिलावरील वाढत्या अत्याचारामुळे नेहमीच टीका सहन कराव्या लागणाऱ्या पक्षातील नेत्यांचा हा कारनामा असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संबंधीत लोकप्रतिनिधींवर पक्षाकडून कारवाई होणार का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
 

Web Title: Video Viral; leader Caught in camera during

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.