VIDEO : सलग सुट्टयामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व ट्रफिक जॅम
By Admin | Updated: August 13, 2016 13:52 IST2016-08-13T12:19:33+5:302016-08-13T13:52:07+5:30
तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक बाहेर पडल्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग ठप्प झाला आहे.

VIDEO : सलग सुट्टयामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व ट्रफिक जॅम
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १३ - या आठवड्यात आलेल्या तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक बाहेर पडल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग ठप्प झाला आहे. शनिवार, रविवार व सोमवारी स्वातंत्रदिन असल्याने चाकरमान्यांना सलग तीन दिवसांची सुट्टी मिळाली असून त्याचा आनंद लुटण्यासाठी लोक बाहेर पडले आहेत. मात्र या गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक अतिशय संथ गतीने सुरु आहे. या मार्गावर वाहनांच्या तीन पदरी रांगा लागल्या आहेत. अमृतांजन पुल ते खालापुर टोलनाका पर्यत वाहनांच्या रांगा असून वाहतुक पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान खंडाळा घाटात कार्गो ट्रक बंद पडला असून त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच वाढ झाली आहे.
तसेच नाशिककडे जाणा-या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे.
( फोटो : विशाल विकारी)