VIDEO : तृप्ती देसाईंने भरचौकात तरुणाला केली बेदम मारहाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 17:23 IST2016-07-27T17:05:01+5:302016-07-27T17:23:42+5:30
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कायदा हातात घेऊन भर चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. नगररोडवरील शिक्रापूर चौकात ही घटना घडली.

VIDEO : तृप्ती देसाईंने भरचौकात तरुणाला केली बेदम मारहाण!
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कायदा हातात घेऊन भर चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. नगररोडवरील शिक्रापूर चौकात ही घटना घडली. श्रीकांत लोंढे असं मारहाण करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे.
श्रीकांतचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होतं. लग्नाचं आमिष दाखवून तीच्याशी शरीरसंबंध ठेवले. मात्र मुलीला दिवस जाऊनही श्रीकांतने लग्न न केल्याने, तसंच पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप न केल्याने, या तरुणाला चोप दिल्याचं, तृप्ती देसाई यांनी सांगितले.