VIDEO : हजारो नागरिकांची उपस्थितीत फडकला 100 फुटांचा तिरंगा
By Admin | Updated: August 15, 2016 18:36 IST2016-08-15T18:36:35+5:302016-08-15T18:36:35+5:30
शिव हेलथ क्लब आणि शिवसंग्राम यांच्या संयुक्त विधमाणे तुकाराम चौकामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी सकाळी 100 फूट कापडाचा तिरंगा फडकविण्यात आला

VIDEO : हजारो नागरिकांची उपस्थितीत फडकला 100 फुटांचा तिरंगा
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १५ - शिव हेलथ क्लब आणि शिवसंग्राम यांच्या संयुक्त विधमाणे तुकाराम चौकामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी सकाळी 100 फूट कापडाचा तिरंगा फडकविण्यात आला. हा आगळावेगळा राष्ट्रीय सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवा मोहोड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात सहभागी झालेल्यानं आणि विध्यार्थ्यांना दूधच वाटप करण्यात आला.शिवा मोहोड, सागर मोहोड, संगम मोहोड, गजानन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनोखा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. शिव संग्राम आणि शिव हेलथ कलुबाचे अध्यक्षय शिवा मोहोड यांनी अकोलेकरांच्या मनात देशभक्ती जागृत।करण्याचा हा छान उपक्रम राबविल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिला.
-----------
असा फडकला राष्ट्रध्वज
100 फूट कापडाचा हा तिरंगा 2
हायड्रोजन फुंग्यावर लोखंडी पाईपच्या सहाययने आकाशात फडकविण्यात आला, तब्बल अर्धा तास हा ध्वज आकाशात मोठ्या दिमाखात फडकत होता. गौरक्षण रोडवरील अनेकांनी वाहने रोडवर थांबून हा सोहळा बघितला.
-----------
नागरिकांच्या सहकार्याने हा अभूतपूर्व स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. यासाठी शिव संग्रामच्या सदस्यांसह नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभाग घेतला.हजारो नागरिकांनी उपस्थित राहून हा अनोखा उपक्रम यशस्वी केला.
शिवा मोहोड
संचालक, शिव हेल्थ क्लब अकोला