VIDEO : मुस्लीमांनी भागवली मराठा कार्यकर्त्यांची तहान

By Admin | Updated: September 22, 2016 15:57 IST2016-09-22T15:06:38+5:302016-09-22T15:57:45+5:30

मराठा क्रांती महामोर्चाच्या निमित्ताने आज लाखो मराठा कार्यकर्ते सकाळपासून सोलापूरात आले

VIDEO: Thousands of Maratha workers marred by Muslims | VIDEO : मुस्लीमांनी भागवली मराठा कार्यकर्त्यांची तहान

VIDEO : मुस्लीमांनी भागवली मराठा कार्यकर्त्यांची तहान

दीपक होमकर, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २२ - मराठा क्रांती महामोर्चाच्या निमित्ताने आज लाखो मराठा कार्यकर्ते सकाळपासून सोलापूरात आले. तब्बल तीन- चार किलो मीटर मोर्चात पायी चालताना लागलेली तहान भागविण्याचे काम मुस्लीमांनी मोफत पाणी वाटप करुन भागविली.  मराठा मोर्चाला सर्व जाती बरोबर सर्व धर्मियांकडून मिळालेली ही साथ हेच सोलापूरच्या मोर्चाच वैशिष्ठ ठरलं.
सकाळी नऊ वाजल्यापासून जुना पुणे नाका संभाजी चौकात लाखो बांधव एकत्र आले तेथून साधारण दोन किलो मिटर अंतरावरील शिवाजी चौकात पायी आले तेथे दुपारी बारा वाजता जिजाऊ वंदना झाली अन मोर्चाला अधिकृतरित्या सुरवात झाली. 
त्यानंतर दुपारी एक दोन पर्यंत लाखोंच्या गर्दीतून वाट काढत प्रत्येकजण अडीच तीन किलोमिटरची वाट तुडवत होम मैदानापर्यंत पोचला. तेव्हा सुमारे पाच किलो मिटरचा प्रवास करताना वाटेत तहान लागल्यानंतर त्यांची तहान भागविण्यासाठी अनेकानी मुस्लीम नागरिकांनी मोफत पाण्याचे पाउच वाटले. मोर्चा संपल्यावरही काही सेवाभावी सस्थांकडून अल्पोपहार , बिस्किटे वाटप करण्यात आली.
 
 

Web Title: VIDEO: Thousands of Maratha workers marred by Muslims