व्हिडिओ - विक्रोळीत लोकलसमोर उडी मारुन आत्महत्या

By Admin | Updated: June 21, 2016 09:39 IST2016-06-21T09:39:09+5:302016-06-21T09:39:09+5:30

विक्रोळी रेल्वे स्थानकावर लोकलसमोर उडी मारुन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Video - Suicide by jumping in front of Vikroli local | व्हिडिओ - विक्रोळीत लोकलसमोर उडी मारुन आत्महत्या

व्हिडिओ - विक्रोळीत लोकलसमोर उडी मारुन आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 21 - विक्रोळी रेल्वे स्थानकावर लोकलसमोर उडी मारुन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. ही अज्ञात व्यक्ती आत्महत्या करत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 
 
विक्रोळी रेल्वे स्थानकावर ही व्यक्ती उभी होती. समोर लोकल येत असल्याचं पाहून या व्यक्तीने अचानक रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली, आणि लोकलसमोर येऊन उभा राहिला. लोकल खूपच जवळ असल्याने त्याला हटवणं किंवा लोकल थांबवणंही शक्य झालं नाही. प्लॅटफॉर्म 3 वर हा सगळा प्रकार घडला. या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस करत आहेत.
 

Web Title: Video - Suicide by jumping in front of Vikroli local