VIDEO: तरुणाची 'धरणा'वर 'मरणा'ची स्टंटबाजी
By Admin | Updated: August 9, 2016 13:41 IST2016-08-09T13:41:00+5:302016-08-09T13:41:00+5:30
नाशिकच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीसाठी एक ते सव्वा लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असताना तरुण स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

VIDEO: तरुणाची 'धरणा'वर 'मरणा'ची स्टंटबाजी
>ऑनलाइन लोकमत -
नाशिक, दि. 9 - आजकाल स्टंट करायचे आणि त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर अपलोड करायचा ट्रेंडच सुरु झाला आहे. या स्टंटबाजीमुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र त्याचा परिणाम या स्टंटबाजीवर झालेला दिसत नाही. असाच धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण धरणाच्या शिडीवर चढून जीवावर बेतणारी स्टंटबाजी करताना दिसत आहे.
नाशिकच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणावर हा तरुण स्टंटबाजी करत आहे. चार दिवसांपुर्वीचा हा व्हिडीओ आहे. धरणातून जायकवाडीसाठी एक ते सव्वा लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असताना हा तरुण हे स्टंटबाजीचे जीवघेणे पराक्रम करताना दिसत आहेत. इतकंच नाही आपले हे पराक्रम जगाला कळावेत यासाठी मित्रांना व्हिडीओही शूट करायला सांगितलं आहे.
विशेष म्हणजे हा तरुण त्या ठिकाणापर्यंत पोहोचला कसा हा प्रश्न उपस्थित होतो. हा तरुण ही स्टंटबाजी करत असताना तिथे एकही सुरक्षारक्षक उपस्थित नसल्याने हा तरुण शिडीवर चढला आणि आपला पराक्रम कॅमे-यात कैद केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र हा तरुण कोण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.