VIDEO- धक्कादायक ! बेदरकार कार चालकाच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: April 17, 2017 18:38 IST2017-04-17T18:18:22+5:302017-04-17T18:38:13+5:30

बाणेर येथे रस्त्यावर दुभाजकावर दोन मुलांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

VIDEO-Stunning! 2 killed in driver's car | VIDEO- धक्कादायक ! बेदरकार कार चालकाच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

VIDEO- धक्कादायक ! बेदरकार कार चालकाच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 - बाणेर येथे रस्त्यावर दुभाजकावर दोन मुलांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलं आईसोबत डी-मार्टमधून खरेदी करून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या तिघांना कारनं धडक दिली. आज दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होती.

रस्ता ओलांडताना गाड्यांची ये-जा सुरू असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या गाडीनं त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलांची आई गंभीर जखमी झाली आहे. मुलांना धडक देणारी गाडी एक महिला चालवत होती. ही महिला पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती.

बाणेरमध्ये आल्यावर तीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तिनं दुभाजकावरील तिघांना जोरदार धडक दिली. ती एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. अद्याप पोलिसांनी या महिलेला अटक केलेली नाही.

Web Title: VIDEO-Stunning! 2 killed in driver's car