VIDEO - दहावीचा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या
By Admin | Updated: March 25, 2017 16:04 IST2017-03-25T14:54:41+5:302017-03-25T16:04:24+5:30
ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 25 - पेपर अवघड गेल्याने दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन ...

VIDEO - दहावीचा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 25 - पेपर अवघड गेल्याने दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना बाळीवेस येथील जैन गुरुकुल प्रशाला येथे घडली.
सुप्रिया संघपाल गाडे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. मयत सुप्रिया ही आदर्श प्रशाला येथे शिकत होती. दहावी बोर्डाचा पेपर जैन गुरुकुल प्रशाला येथे घेण्यात येत होता. दरम्यान गणित विषयाचा पेपर अवघड गेल्याने तिने प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. जखमी झाल्याने तिला जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यनंतर तिला पुढील उपचारांसाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचा अंत झाला.
या घटनेनंतर पालकांनी सुप्रिया हिच्या मुत्यूस जबाबदार असणाऱ्या शिक्षिकावर जोपर्यंत कारवाई होत नाही, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सुप्रियाचे प्रेत उचलणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने रूग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
https://www.dailymotion.com/video/x844ums