शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

VIDEO : एसटीच्या आपत्कालीन खिडक्यांची ‘आफत’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 15:40 IST

जुन्या ‘एसटी’मध्ये एकच संकटकालीन दरवाजा आहे. दुर्दैवाने अपघात घडल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यास तो अपुरा ठरतो.

- राम देशपांडे
 
अकोला, दि. ९ -   जुन्या ‘एसटी’मध्ये एकच संकटकालीन दरवाजा आहे. दुर्दैवाने अपघात घडल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यास तो अपुरा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन, ताफ्यात नव्याने दाखल होणा-या प्रत्येक ‘एसटी’ला दोन आपत्कालीन खिडक्या लावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय निश्चित यथायोग्य म्हणावा लागेल; मात्र सध्या अस्तीत्वात असलेल्या आपत्कालीन खिडक्यांच्या स्थितीची तपासणी कोण करणार हाच प्रश्न आहे. महाड येथील दूर्घटना घडल्याच्या पृष्ठभूमीवर अकोल्यातील बसगाड्यांचे आपत्कालीन खिडक्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी स्टिंग केले असता या खिडक्या व दरवाजेच ‘आफत’ ठरतील असे असल्याचे वास्तव उघडकीस आले. 
महाराष्ट्रात मोठ्या शहरापासून लहान, दुर्गभ भागात दररोज हजारो एसटी बसेस धावतात. सुरक्षित प्रवास म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. प्रवासादरम्यान दुर्दैवाने एखादई आपत्ककालीन परिस्थितीत उद्भवल्यास प्रवाशांना वेळीच बाहेर पडता यावे याकरिता प्रत्येक बसला एक संकटकालीन दरवाजा असतो. काळानुरूप त्याची जागा बदलली. जुन्या बसगाड्यांमध्ये तो पाठीमागे असून, तर त्यानंतर दाखल झालेल्या गाड्यांमध्ये ही व्यवस्था चालकाच्या मागील असनाजवळ करण्यात आली आहे. ‘हिरकणी’, ‘आशियाड’, ‘रातराणी’ यांसारख्या केवळ एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चालकाच्या मागे व त्याच दिशेने अखेरच्या आसनाजवळ अशा दोन आपत्कालीन खिडक्या आहेत. स्टिंग आॅपरेशनदरम्यान ‘लोकमत’ चमूने नव्या व जुन्या बसस्थानकांसह दोन्ही आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांच्या आपत्कालीन खिडक्यांची उघड-झाप होते की नाही, याची चाचपणी केली. ज्यामध्ये जुन्या बसगाड्यांचे संकटकालीन दरवाजे देखभाल व दुरुस्तीअभावी ‘जाम’ (उघडेनासे) झाले असल्याचे वास्तव समोर आले. दुर्दैवाने अपघात घडल्यास, ज्यांची अकारण कधीच उघडझाप होत नाही, असे आपत्कालीन दरवाजे प्रवाशांकरिता ‘आफत’कालीन ठरणार असल्याचे धडधडीत वास्तव समोर आले आहे. 
ताफ्यात नव्याने दाखल होणºया प्रत्येक बसला दोन आपत्कालीन दरवाजे लावण्याचा निर्णय मुळीच चुकीचा नाही; मात्र जुन्या बसगाड्यांच्या आपत्कालीन दरवाजांना नियमित आॅइलिंगग, ग्रिसिंग होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘एआयएस-५२’(आॅटोमोबाइल इंडियन स्टँडर्ड-५२) या नियमानुसार आता ‘एसटी’ची बांधणी केली जात आहे. या नव्या नियमानुसार बसची बांधणी करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे बसची बांधणी अधिक मजबूत होणार हे निश्चित; मात्र सध्याच्या घडीला विभागातील ज्या गाड्या भंगार अवस्थेत धावत आहेत, त्यांमध्ये प्रवास करणा-यांच्या जिवाला घोर लाणार, हे ही तितकेच खरे!