VIDEO : शिवसैनिकांनी फोडली श्रीहरी अणे यांची गाडी

By Admin | Updated: March 23, 2017 19:36 IST2017-03-23T18:49:35+5:302017-03-23T19:36:32+5:30

ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 23 - मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी  मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे शहरातील महसुल प्रबोधिनीत दुपारी ३ वाजता मेळावा ...

VIDEO: Shree Shanihri Anne's car attacked by Shiv Sainiks | VIDEO : शिवसैनिकांनी फोडली श्रीहरी अणे यांची गाडी

VIDEO : शिवसैनिकांनी फोडली श्रीहरी अणे यांची गाडी

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी  मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे शहरातील महसुल प्रबोधिनीत दुपारी ३ वाजता मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्वतंंत्र विदर्भ राज्य आघाडीचे नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र या कार्यक्रमाला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला होता. हा कार्यक्रम होऊ न देण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केली होती. अणे यांची गाडी येताच त्यावर तुफान दगडफेक करण्यात आली.
स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितीसाठी  मराठवाडा मुक्ती मोर्चाचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा शिवसैनिकांनी अगोदरच दिला होता. यामुळे कार्यक्रम स्थळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमख राजू वैद्य यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर गर्दी केली होती. कार्यक्रम होऊ न देण्यासाठी खडा पहारा देण्यात येत होता. श्रीहरी अणे यांची गाडी दुधडेअरी जवळ येताच शिवसैनिकांनी तुफान दगडफेक करण्यात आली. यात गाडीच्या काचा फोडण्यात आला. यामुुळे श्रीहरी अणे हे कार्यक्रमस्थळी येण्याऐवजी शहराबाहेर निघून घेले. या सर्व प्रकारावर मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष प्रा. बाबा उगले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितीसाठी कितीही विरोध झाला तरी तो करणारच असल्याचा निर्धारही प्रा. उगले यांनी व्यक्त केला.

https://www.dailymotion.com/video/x844uk4

Web Title: VIDEO: Shree Shanihri Anne's car attacked by Shiv Sainiks