VIDEO- शरद पवार यांच्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीचा गौरव सोहळा

By Admin | Updated: May 28, 2017 18:42 IST2017-05-28T18:42:51+5:302017-05-28T18:42:51+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 28 - भारताचे माजी कृषी आणि संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार ...

VIDEO - Sharad Pawar's golden jubilee celebration will be celebrated | VIDEO- शरद पवार यांच्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीचा गौरव सोहळा

VIDEO- शरद पवार यांच्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीचा गौरव सोहळा

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 28 - भारताचे माजी कृषी आणि संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकट मुलाखतीचा कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सावरकरनगर येथील विश्वास लॉन्स याठिकाणी लेखक अंबरिश मिश्र, निवेदक सुधीर गाडगीळ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व दत्ता बाळ सराफ ही त्रयी शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्वास बॅँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी, कै. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, सपकाळ नॉलेज हब, सारस्वत बॅँक यांच्या वतीने या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शरद पवार यांचा सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी विधानपरिषदचे सभापती दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री विनायकदादा पाटील, माजी आमदार हेमंत टाकले, आमदार दिलीप बनकर, विश्वास ठाकूर, कैलास कमोद आदी मान्यवर उपस्थित आहे .

https://www.dailymotion.com/video/x844zs2

Web Title: VIDEO - Sharad Pawar's golden jubilee celebration will be celebrated