VIDEO- सेना नेते विनायक राऊत अन् आ. हेमंत पाटील यांच्यात वाद

By Admin | Updated: June 29, 2017 19:45 IST2017-06-29T18:11:21+5:302017-06-29T19:45:22+5:30

ऑनलाइन लोकमत नांदेड, दि. 29 - नांदेडचे आमदार हेमंत पाटील आणि सेना नेते विनायक राऊत यांच्यात वाद झाला. शिवसेना ...

VIDEO - Senate leader Vinayak Raut and others. Debate between Hemant Patil | VIDEO- सेना नेते विनायक राऊत अन् आ. हेमंत पाटील यांच्यात वाद

VIDEO- सेना नेते विनायक राऊत अन् आ. हेमंत पाटील यांच्यात वाद

ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 29 - नांदेडचे आमदार हेमंत पाटील आणि सेना नेते विनायक राऊत यांच्यात वाद झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष या दोन नेत्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. नांदेडमध्ये आयोजित शेतकरी संवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. तेव्हा आमदार हेमंत पाटील माइकवरून पक्षप्रमुखांचे स्वागत करत होते. त्याच वेळी खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी आले. दुस-याला माइक देण्याची सूचना राऊत यांनी आमदार हेमंत पाटील यांना केली. पण माइक सोडण्यास हेमंत पाटील तयार नव्हते, माईक सोडायला सांगणा-या राऊत यांना व्यासपीठावरच हेमंत पाटील यांनी झिडकारून लावले. या दोन नेत्यांतील वादामुळे शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली.

https://www.dailymotion.com/video/x8456vd

Web Title: VIDEO - Senate leader Vinayak Raut and others. Debate between Hemant Patil