VIDEO : राज ठाकरेंनी केले लोकमतचे कौतुक
By Admin | Updated: January 11, 2017 15:12 IST2017-01-11T13:07:26+5:302017-01-11T15:12:10+5:30
लोकमत एक निष्पक्ष वर्तमानपत्र असून, नोटाबंदी सारख्या महत्वाच्या विषयांवर वार्तांकन करताना लोकमतने दोन्ही बाजू मांडल्या.

VIDEO : राज ठाकरेंनी केले लोकमतचे कौतुक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - लोकमत एक निष्पक्ष वर्तमानपत्र असून, नोटाबंदी सारख्या महत्वाच्या विषयांवर वार्तांकन करताना लोकमतने दोन्ही बाजू मांडल्या. कुणा एकाची तळी उचलली नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकमतच्या निष्पक्ष वार्तांकनाचे कौतुक केले.
मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन प्रथमच लाईव्ह चॅटच्या माध्यमातून राज यांनी आज संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेनेवर जोरदार टीका करताना राज यांनी आपल्या शैलीत पत्रकारांनीही फटकारले.
वर्तमानपत्रे, चॅनल्स विकले गेल्यासारखे बातम्या देत आहेत. या सर्व परिस्थितीत लोकमतसारखे वर्तमानपत्र निष्पक्षपणे वार्तांकन करत आहे अशा शब्दात राज यांनी लोकमतचे कौतुक केले.
काय म्हणाले राज ठाकरे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा