VIDEO - पोलीस भरती : उंची वाढविण्यासाठी उमेदवाराने डोक्यावर लावला विग

By Admin | Updated: March 25, 2017 14:05 IST2017-03-25T13:02:03+5:302017-03-25T14:05:15+5:30

 ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 25 - पोलिस भरतीमध्ये नकली केसांचा विग परिधान करुन उंची वाढवणा-या एका उमेदवाराला नाशिक पोलिसांनी ...

VIDEO - Police recruitment: Candidate wig for raising height wig | VIDEO - पोलीस भरती : उंची वाढविण्यासाठी उमेदवाराने डोक्यावर लावला विग

VIDEO - पोलीस भरती : उंची वाढविण्यासाठी उमेदवाराने डोक्यावर लावला विग

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 25 - पोलिस भरतीमध्ये नकली केसांचा विग परिधान करुन उंची वाढवणा-या एका उमेदवाराला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल किसन पाटील असे या उमेदवाराचे नाव आहे. सुरुवातीला त्याची निवड झाली होती. मात्र एका चणाक्ष पोलिस कर्मचा-यांचे त्याच्या डोक्यावर लक्ष गेले आणि त्याची चोरी पकडली गेली. 
 
राहुल त्र्यंबकेश्वर येथे राहाणार असून कुठल्याही परिस्थितीत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्याने हे खोटेपणा केला. त्याचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 
 
युवकांनी अशी फसवणूक करु नये तसेच कुठल्याही भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त श्रीकांत  धिवरे यांनी केले आहे. नाशिकमध्ये पोलिस भरतीचा आज चौथा दिवस आहे. 
 
https://www.dailymotion.com/video/x844umj

Web Title: VIDEO - Police recruitment: Candidate wig for raising height wig