VIDEO : पुण्यात पीएमपीच्या बसला आग
By Admin | Updated: August 31, 2016 18:11 IST2016-08-31T18:11:02+5:302016-08-31T18:11:02+5:30
पुण्यातील सातारा रस्त्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास पीएमपी बसने अचानक पेट घेतला.

VIDEO : पुण्यात पीएमपीच्या बसला आग
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 31 - पुण्यातील सातारा रस्त्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास पीएमपी बसने अचानक पेट घेतला.
हि बस कात्रजकडून स्वारगेटच्या दिशेने जात होती. बीआरटी मार्गातील लोकेश हॉटेलसमोर असलेल्या थांब्यावर हि बस थांबली असता इंजिनमधून धूर येऊ लागला. यामुळे चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, या घटनेमुळे सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, बघ्यांची एकच गर्दी झाली होती.