VIDEO : करीरोड येथे मोनो रेल ट्रॅकचा काही भाग कोसळला

By Admin | Updated: October 8, 2016 15:12 IST2016-10-08T14:49:37+5:302016-10-08T15:12:53+5:30

मोनो रेल्वेच्या दुस-या टप्प्याचे बांधकाम सुरु असलेल्या साईबाबा पथ ते करीरोड मार्गावर मोनो रेल्वेचे काही भाग निखळल्याचे समोर आले आहे.

VIDEO: A part of the Mono Rail track collapsed at Currieode | VIDEO : करीरोड येथे मोनो रेल ट्रॅकचा काही भाग कोसळला

VIDEO : करीरोड येथे मोनो रेल ट्रॅकचा काही भाग कोसळला

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ८ - मोनो रेल्वेच्या दुस-या टप्प्याचे बांधकाम सुरु असलेल्या साईबाबा पथ ते करीरोड मार्गावर मोनो रेल्वेचे काही भाग निखळल्याचे समोर आले आहे. मोनो रेलेचा दुसरा टप्पा साईबाबा पथवरुन करीरोड ते आर्थररोड नाका असा गेला आहे. 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २०४ प्रभागाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. इन्शुलिन ब्रेक झाल्याने हे पार्ट कोसळत असल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे. यामुळे कोणताही धोका नसल्याचे अभियंत्याचे म्हणणे आहे. 
 
अद्यापही इथून वाहतूक सुरु आहे. मनसे कार्यकर्त्यांनी काळाचौकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी  केली आहे. दोषींविरोधात चौकशी करण्याची मागणी  केली असून, वाहतूक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष   केले आहे.    
 
 
            

Web Title: VIDEO: A part of the Mono Rail track collapsed at Currieode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.