VIDEO : धुळ्यात उत्साहाच्या भरात दिला पाकिस्तान झिंदाबादचा नारा

By Admin | Updated: September 22, 2016 16:10 IST2016-09-22T16:10:09+5:302016-09-22T16:10:29+5:30

धुळ्यामध्ये देशभक्त तरूणांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला, मात्र उत्साहाच्या भरात जमावाने पाकिस्तान झिंदाबादचा नारा दिला.

VIDEO: Pakistan Zindabad slogan fills Dhulal with enthusiasm | VIDEO : धुळ्यात उत्साहाच्या भरात दिला पाकिस्तान झिंदाबादचा नारा

VIDEO : धुळ्यात उत्साहाच्या भरात दिला पाकिस्तान झिंदाबादचा नारा

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 22 - पाकिस्तान सीमेवर काढत असलेल्या कुरापतींमुळे आणि भारतीय जवानांना पत्कराव्या लागणाऱ्या हौतात्म्यामुळे देशभरात पाकिस्तान विरोध वातावरण तयार होत आहे. ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात येत आहेत, नवाझ शरीफ यांचे पुतळे जाळण्यात येत आहेत, तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा घुमत आहेत.
धुळ्यामध्ये देशभक्त तरूणांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला आणि मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. मात्र, उत्साहाच्या भरात नवाझ शरीफ मुर्दाबादच्या नाऱ्यानंतर या जमावानं पाकिस्तान झिंदाबादचा नारा दिला. तो दिल्यावर लगेचच त्यांच्या ही चूक लक्षात आली आणि त्यांनी पुन्हा जोराने पाकिस्तान मुर्दाबादचा नारा देत चूक सुधारली.

Web Title: VIDEO: Pakistan Zindabad slogan fills Dhulal with enthusiasm