VIDEO : टपावरून प्रवास करताना ओव्हरहेडवायरचा धक्का लागून तरूण भाजला
By Admin | Updated: October 27, 2016 15:28 IST2016-10-27T15:28:49+5:302016-10-27T15:28:49+5:30
- स्टंटबाजी करण्याच्या नादात लोकलच्या टपावरून प्रवास करणा-या तरूणाला ओव्हरहेड वायरचा जोरदार धक्का लागून तो ६५ टक्के भाजला.

VIDEO : टपावरून प्रवास करताना ओव्हरहेडवायरचा धक्का लागून तरूण भाजला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - स्टंटबाजी करण्याच्या नादात लोकलच्या टपावरून प्रवास करणा-या तरूणाला ओव्हरहेड वायरचा जोरदार धक्का लागून तो ६५ टक्के भाजला आहे. हार्बर मार्गावरील टिळकनगर येथे रविवार संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सध्या बरेच व्हायरल झाले आहे.
अब्दुल अन्सारी असे त्या तरूणाचे नाव असून कुर्ल्याहून गोवंडीला घरी जाण्यासाठी त्याने लोकल पकडली. मात्र लोकलमध्ये न बसता त्याने थेट टपावर उडी घेत तेथेच मुक्काम ठोकला. दरम्यान ही लोकल टिळकनगर स्थानकाजवळ आली असता 25 हजार व्होल्टेजच्या ओव्हरहेड वायरला अब्दुलचा स्पर्श झाला आणि एका क्षणात तो होरपळून निघाला. या दुर्घटनेत तो 65 टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर गाडीतील इतर प्रवासी तातडीने उड्या मारुन बाहेर आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.